Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या Swiggy या कंपनीची समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे. या कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच
Swiggy boy viral video
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 5:54 PM

मुंबई : सध्या ऑनलाईनचे युग आहे. कपड्यांच्या खरेदीपासून ते जेवणाच्या पदार्थांपर्यंत सगळंकाही आजकाल ऑनलाईन पद्धतीने मागवले जाते. ऑनालाईन जेवण पुरवणाऱ्या झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्या यामध्ये अग्रेसर आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही कंपन्या यापूर्वी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा आलेल्या आहेत. सध्या Swiggy या कंपनीची समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे. या कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील तरुणाने थेट स्केटिंग करत फूड डिलिव्हरी केली आहे. (Swiggy delivery boy skating on road video went viral on social media)

स्केटिंग करत फूड डिलिव्हरी

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्विगी कंपनीचे जेवण पुरवणारा एक डिलिव्हरी बॉय दिसतो आहे. एरव्ही सायकल किंवा बाईकवर फूड डिलिव्हर करणारे आपण पाहिले आहेत. मात्र, या व्हिडीओतील हा तरुण सायकल किंवा बाईकवर नव्हे तर थेट स्केटिंग करत जेवणाच्या ऑर्डर ग्राहकांना त्यांच्या घरी नेऊन देत आहे. लोकांना हा डिलिव्हरी बॉय चांगलाच आवडला आहे.

पाहा व्हिडीओ :

तरुण रस्त्यावर स्केटिंग करतो आहे

या व्हिडीओमध्ये एक तरुण स्केटिंग करताना दिसतोय. त्याच्या पाठीवर स्विगी कंपनीची फूड डिलिव्हरी बॅग आहे. तो ऑनलाईन पद्धतीने मागवलेले जेवण ग्राहकांना पोहोचवतो आहे. यावेळी तो करत असलेले स्केटिंग अतिशय थरारक आहे. वाहनं भरधाव वेगाने चालत असताना हा तरुण रस्त्यावर स्केटिंग करतो आहे. समोर आपल्याला बससुद्धा दिसते आहे. वाहने वेगात धावत असली तरी हा तरुण अतिशय निडर होऊन स्केटिंग करत फूड डिलिव्हरी करतो आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकऱ्यांना या तरुणाची जिद्द आणि स्केटिंगची पद्धत चांगलीच आवडली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी डिलिव्हरी बॉयच्या जिद्दीला सलाम ठोकत आहेत. तसेच त्याच्या स्केटिंग स्कीलची वाहवा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे.

इतर बातम्या :

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल

Video | समोर पाणी पाहताच हत्तीचे पिल्लू खुश, धम्माल मस्तीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

(Swiggy delivery boy skating on road video went viral on social media)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.