Video : एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल, कारमधील माणूस चक्क हवेत उडाला; व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्ते अपघाताचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकाच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही.
नवी दिल्ली : जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतो. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे रस्ते अपघात हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. एका रिपोर्टनुसार जवळपास 30 ते 40 टक्के अपघात हे वेगाने वाहने चालवण्याने होत असल्याचं उघड झालं आहे. सोशल मीडियावर अशा अपघातांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओतील अपघाताची दृश्य मन विचलीत करणारी आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचा अचानक अपघात होतो. हा अपघात इतका धोकादायक असतो की कार पेट घेते आणि अपघात झाल्याबरोबर कारमधील माणूस चक्क हवेत काही फूट उंच उडतो. हे दृश्य हादरवून टाकणारं आहे. अपघात झाल्यानंतरही इतर वाहने बेमालूमपणे रस्त्याने जाताना दिसत आहेत. त्यांना काही पडलंच नसल्याचं यातून दिसून येत आहे.
रॉन्ग साईडने कार घुसली
याचवेळी एक कार रॉन्ग साईडने वेगाने मध्येच घुसताना दिसत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ अनेक कार एकमेकांवर धडकताना दिसत आहे. या भीषण अपघातानंतर कारमधील एक व्यक्ती हवेत उडताना दिसत आहे. हा व्यक्ती हवेत काही फूट उंच उडून दूरवर जाऊन धडामपणे पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अपघात किती भयंकर आहे हे तुम्हालाही दिसून येईल. असा भयंकर अपघात तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यात पाहिला नसेल. ही दृष्य पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.
अवघ्या नऊ सेकंदात…
अंगावर रोमांच उभा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची पृष्टी झालेली नाही. कोणत्या देशातील आहे हे माहीत नाही. पण व्हिडीओ खरा असल्याचं सांगितलं जात आहे. ट्विटरवर @cctvidiots या नावाने असलेल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ आहे. अवघा 9 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. आतापर्यंत 11 मिलियन म्हणजे 1.1 कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 41 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.
Wear your seatbelt ? pic.twitter.com/WYmm5xw1Mf
— CCTV IDIOTS (@cctvidiots) June 17, 2023
ती व्यक्ती वाचली का?
या व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यांच्याकडून एकच प्रश्न केला जात आहे. तो म्हणजे, ती व्यक्ती वाचली का? असा सवाल नेटकरी करत आहेत. त्या व्यक्तीचं काय झालं? या एका प्रश्नाने नेटकऱ्यांना पछाडलेलं दिसत आहे. त्यावर काहीच उत्तर मिळालेलं नसल्याने नेटकरी अधिकच चिंतीत झाले आहेत.