दुर्घटना टळली! तब्बल 18 विद्यार्थी वाचले, ठाण्यातला व्हिडीओ व्हायरल
ही संपूर्ण घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील आहे. बसमध्ये सुमारे 18 मुले होती.
सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक स्कूल बस उलटलीये. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस उलटली आणि अपघात झालाय. ड्रायव्हरने रिव्हर्स गिअर टाकून बस मागे घेण्याचा प्रयत्न करताच बस अनियंत्रितपणे उलटते. ज्यानंतर विद्यार्थ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. ही संपूर्ण घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील आहे. अपघातावेळी बसमध्ये सुमारे18 मुले होती.
ठाण्यातील अंबरनाथ परिसरात ही बस मुलांना घेऊन शाळेत जात असताना हा अपघात झाला. चालक बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न करत असताना बस अनियंत्रितपणे उलटली.
@PMOIndia@nitin_gadkari@CMOMaharashtra @DGPMaharashtra @ThaneCityPolice @ThaneCollector Ambernath(Thane) #INNERQWHEELSCHOOL bus (MH43H0479)got accident inside #GreenCityComplex Ambernath e.Seems rejected bus was used 2Transport school students as no details found on #RTOOnline pic.twitter.com/5EfGtFv8FH
— Ambernath Citizen’s Forum (ACF) (@ACF8983506000) September 26, 2022
सुदैवानं यातल्या एकाही मुलाला फारशी इजा झाली नाही. बस पलटी होताच तिथे उपस्थित लोक धावतात आणि मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली.
अपघात पाहणाऱ्यांनी सांगितलं, चालक बस मागे घेत असताना बस अनियंत्रितपणे उलटली. अपघातानंतर आत बसलेली मुलं घाबरून ओरडू लागली.
Horrible !!! And driver have asked to small girl to put stone under Tyre.@mulund_info https://t.co/1WGm7z5KMS
— Mukesh Vashdev Makhija ?? (@MukeshVMakhija) September 26, 2022
चांगली गोष्ट म्हणजे आजूबाजूला काही लोकं होती ज्यांनी ताबडतोब मुलांना बसमधून बाहेर काढायला सुरुवात केली. या अपघाताचा हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.