Viral: वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी घर विकलं, मुलाने मान राखला…आयएएस होऊन नावंच काढलं!

प्रदीपचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. प्रदीपच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. प्रदीपच्या सिव्हिल सर्व्हिसच्या अभ्यासामुळे वडिलांना त्यांचे घर विकावे लागले. इतक्या अडचणींना तोंड देऊनही प्रदीपने हार मानली नाही.

Viral: वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी घर विकलं, मुलाने मान राखला...आयएएस होऊन नावंच काढलं!
आयएएस होऊन नावंच काढलं!Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:40 PM

नवी दिल्ली: कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों…! दुष्यंत कुमार जी यांनी लिहिलेली ही ओळ तुम्ही वाचली असेलच. बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी प्रदीप सिंग (IAS Pradip Singh) यांनी ही म्हण पूर्णपणे खरी ठरवलीये, ते वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी 2022 मध्ये यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी (IAS Officer) बनले आहेत. प्रदीपचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. प्रदीपच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. प्रदीपच्या सिव्हिल सर्व्हिसच्या अभ्यासामुळे वडिलांना त्यांचे घर विकावे लागले. इतक्या अडचणींना तोंड देऊनही प्रदीपने हार मानली नाही आणि मेहनतीमुळे तो पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीसारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण झाला.

तयारीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय

आयएएस अधिकारी प्रदीप सिंह हे मूळचे बिहारचे असले तरी त्यांचं कुटुंब इंदूरमध्ये राहतं. प्रदीप लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आहे. इंदूरमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. प्रदीपच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी प्रदीपने बारावी उत्तीर्ण होऊन यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. प्रदीपचे वडील पेट्रोल पंपावर काम करायचे, मुलाला युपीएससीच्या शिक्षणासाठी दिल्लीला पाठवण्याइतके उत्पन्न त्याच्याकडे नव्हते. अशा परिस्थितीत प्रदीपला दिल्लीला पाठवण्यासाठी त्यांनी आपलं घर विकलं.

त्यागामुळे प्रचंड दडपण, भारतीय महसूल सेवेत नियुक्ती

दिल्लीला पोहोचल्यावर प्रदीप यूपीएससी परीक्षेसाठी सज्ज झाला. मात्र, घर विकून वडिलांनी केलेल्या त्यागामुळे त्याच्यावर प्रचंड दडपण आले होते. अशा परिस्थितीत युपीएससीची परीक्षा लवकरात लवकर उत्तीर्ण होऊन आपण आयएएस अधिकारी होऊ आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करू, असा निश्चय त्यानी केला. 2018 मध्ये प्रदीपने पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती, ज्यात त्याने भारतात 93 वा क्रमांक मिळवला होता. मात्र, त्याची आयएएससाठी निवड झाली नाही. प्रदीपची भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) नियुक्ती करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

पुन्हा तयारीला सुरुवात,आयएएस होऊन नावंच काढलं!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीप सिंह सांगतात की, वर्ष 2018 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालो, पण आयएएस होण्यापासून तो फक्त एक रँक गमावला.आयपीएस होण्याचा पर्यायही त्यांच्याकडे होता, पण त्यांनी महसूल सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. पुढे सेवेदरम्यान त्यांनी विश्रांती घेत पुन्हा तयारीला सुरुवात केली आणि यावेळी त्यांनी भारतात 26 वा क्रमांक मिळवला, त्यानंतर त्यांची आयएएस अधिकाऱ्यासाठी निवड झाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.