SSC Results 2022: शाब्बास! 35%वाल्या फेमस शुभमचं पॉसिटीव्ह स्पिरीट! म्हणतो,” जे झालं ते झालं, आता पोलीस होणार”

महत्त्वाचं काय? पास झालाय. दहावीत नापास होऊन सुद्धा आयुष्यात नंतर ज्यांनी नाव काढलं असे खूप लोकं आहेत. शुभम जाधव सुद्धा असंच काहीसं करेल अशी आशा आहे!

SSC Results 2022: शाब्बास! 35%वाल्या फेमस शुभमचं पॉसिटीव्ह स्पिरीट! म्हणतो, जे झालं ते झालं, आता पोलीस होणार
35%वाल्या फेमस शुभमचं पॉसिटीव्ह स्पिरीट!Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:35 PM

पुणे: कधी परीक्षेचं टेन्शन (Exam Tension) आलंय का? हा पण काय प्रश्न आहे, परीक्षा म्हटलं तर अंगावर काटा उभा राहणारच. काही काही लोकांना नुसतं पास व्हायचं पण टेन्शन असतं बरं का. परीक्षेच्या निकालाचे पण अजब गजब किस्से असतात. कधी कुणी एकाच मार्काने नापास (Fail In SSC Exam) काय होतो, कुणाचा एकच विषय काय राहतो तर कुणी नुसत्या एकाच विषयात काय पास होतो. जितक्या व्यक्ती तितके किस्से! दहावीचा रिझल्ट नुकताच जाहीर करण्यात आलाय. ह्यातला एक किस्सा बराच चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल असून असून कायच असेल नाही का…! किस्सा असा आहे कि एक मुलगा सगळ्या विषयात नापास होता होता वाचलाय! भाऊंना सगळ्या विषयांत 35 गुण (35 Mraks In Every Subjects) मिळालेत. सगळ्याच विषयांत दादा काठावर पास झालेत. आहे ना वाढीव किस्सा?

महत्त्वाचं काय? पास झालाय

शुभम जाधवला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र अशा सगळ्या विषयांत प्रत्येक 35 गुण मिळालेले आहेत. 35 टक्के गुण मिळवून शुभम जाधवने एक वेगळाच किस्सा सगळ्यांसमोर आणलाय. महत्त्वाचं काय? पास झालाय. शुभम म्हणतो, “मी ऑनलाईन अभ्यास करायचो ऑनलाईन इतकं समजत नव्हतं. याशिवाय हार्डवेअरच्या दुकानात काम करून मी अभ्यास केला. नववीला मला चांगले मार्क्स होते. आता जे झालं ते झालं पण आता मी पोलीस होणार. मला पोलीस व्हायचं आहे!” दहावीत नापास होऊन सुद्धा आयुष्यात नंतर ज्यांनी नाव काढलं असे खूप लोकं आहेत. शुभम जाधव सुद्धा असंच काहीसं करेल अशी आशा आहे!

हे सुद्धा वाचा

पुणे तिथे काय उणे?

पुणे तिथे काय उणे? पुण्यात काय बुआ कशाची कमी नाही. इथे राहणाऱ्या लोकांची जगात चर्चा आहे असं बरेचदा मस्करीत म्हटलं जातं. विद्येचं माहेघर असणारं पुणे शिक्षणात अव्वल! कुठलाही रिझल्ट असो पुणे शहराचा रिझल्ट हा कधीच यादीत शेवटी दिसणार नाही, अहो असं काय करता विद्येचं माहेरघर नव्हे का? दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून मुलं पुण्यात शिकायला येतात. शुभम हा पुण्याचाच रहिवासी आहे. तो पुण्यात गंज पेठेत राहतो. शुभम हा पुण्यातील रमणबाग शाळेचा विद्यार्थी आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.