ऐकावं ते अजबच! सगळ्या तर्कांना खोटं ठरवत दोन तोंडाचा साप 17 वर्ष जिवंत, वैज्ञानिकही आश्चर्यचकीत…
हा साप अमेरिकेतील मिसुरी येथील डेल्टा शहरात एका मुलाला सापडला. वर्ष 2005 साली त्याला हा साप सापडला. मुलाला हा दोन तोंडी साप अंगणात दिसला. त्यानंतर त्याला केप गिरार्डेऊ संरक्षण निसर्ग केंद्रात आणण्यात आलं.
मुंबई : तुम्ही विविध जातीचे साप पाहिले असतील. पण दोन तोंडाचा साप पाहिला आहे का? सध्या याच तोंडाच्या सापाची जोरदार चर्चा आहे. हा साप लवकर मरेन अशी भिती व्यक्त केली जात होती. शास्त्रज्ञांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे. पण आता तो 17 वर्षांचा होणार आहे. हा साप कोटीत एक असल्याचं जाणकारांचं मत आहे.हा साप 5 फूट लांब आहे. या सापाने जंगलात राहणाऱ्या ब्लॅक रॅट (Black rat snake) या प्रजातींच्या आयुर्मानची मर्यादा ओलांडली आहे. दोन तोंडी असलेला हा साप अत्यंत दुर्मिळ मानला जातो. हा साप अमेरिकेतील मिसुरी येथील डेल्टा शहरात एका मुलाला सापडला. या सापाची सध्या सोशल मीडियावर चर्चा (Viral News) आहे.
हा साप अमेरिकेतील मिसुरी येथील डेल्टा शहरात एका मुलाला सापडला. वर्ष 2005 साली त्याला हा साप सापडला. मुलाला हा दोन तोंडी साप अंगणात दिसला. त्यानंतर त्याला केप गिरार्डेऊ संरक्षण निसर्ग केंद्रात आणण्यात आलं. ब्रिटीश हर्पेटोलॉजिकल सोसायटीचे कौन्सिल सदस्य आणि सापांचे तज्ञ स्टीव्ह अॅलन यांनी सांगितलं की असे दोन तोंड असलेले साप तोंड असलेले साप लाखांमध्ये एक असतात आणि जे इतके दिवस जगणारा साप तर कोटींमध्ये एक आहे.
“मला एक आणि दोन तोंडी सापांची माहीती आहे. त्यातला एक साप 20 वर्षे जगला. त्यामुळे असे साप दुर्मिळ असतात. या आकाराचा एक सामान्य साप संपूर्ण उंदीर गिळू शकतो. पण या दोन तोंडी सापांना हे जमत नाही, असं स्टीव्ह यांनी सांगितलं.
जेव्हा एक स्वतंत्र अंडी फलित केलं जातं आणि जुळी मुले तयार करण्यासाठी विभक्त होणे सुरू होते तेव्हाच साप दोन तोंडी असू शकतो. पण त्याला पूर्णपणे वेगळे करता येत नाही. ब्लॅक रॅट साप लाजाळू म्हणून ओळखले जातात. जो कोणत्याही संघर्षापासून दूर राहतो. पण जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते हल्ला करतात. ते विषारी नसतात.