वडिलांच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत तरूणीने बांधली लग्नगाठ, आईनंही रोखलं नाही, कारण तर वाचा…
सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट व्हायरल होत आहे. यात एका तरूणीने तिच्या पित्याच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत लग्नगाठ बांधली येईल.
मुंबई : सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. अशीच एका लग्नाची गोष्ट सध्या व्हायरल (viral news) होत आहे. यात एका मुलीने तिच्या पित्याच्या मारेकऱ्याच्या मुलाशी लग्न केलं आहे. एका तरुणाने वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मुलासोबत लग्न लग्न केलं आहे. यात या मुलीच्या आईनेही तिला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या मागेही विशेष कारण आहे. ही घटना पूर्व आफ्रिकेतील रवांडा या देशातील आहे. ही घटना 1994 सालीची आहे. रवांडामध्ये नरसंहार झाला. 100 दिवसांत सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू झाला. यादरम्यान बर्नाडेट मुकाकाबेरा यांच्या पतीचीही हत्या करण्यात आली. बर्नाडेट मुकाकाबेरा यांनी बीबीसी या वृत्त संस्थेशी बातचित केली तेव्हा त्यांनी या घटनेची माहिती दिली. बर्नाडेट यांनी सांगितलं की, मला मान्य आहे की माझ्या पतीचं निधन झालं. पण माझी मुलगी आणि हा तरूण एकमेकांच्या प्रेमात होते. ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात त्यामुळे त्यांना रोखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना मीच काय कोणीही रोखू शकत नाही.”
6 एप्रिल 1994 रोजी रवांडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर या हत्याकांडाला सुरुवात झाली. तो हुतू समाजातून आला होता.घटनेच्या काही तासांनंतर तुत्सी समाजातील लोकांवर त्याचा राग अनावर झाला. हुतू समाजाच्या लोकांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तुत्सी समाजाच्या लोकांना मारायला सुरूवात केली. बर्नाडेट आणि त्यांचे पती काबेरा वेदस्ती तुत्सी समुदायाचे आहेत. शेजारी ग्रेटियन न्यामिनानी हा हुतू समुदायाचा होता. ते दोघेही शेतकरी होते. हे हत्याकांड संपल्यानंतर तुत्सी समाजाचे लोक सत्तेवर आले. त्यानंतर हत्येमध्ये सहभागी लाखो लोकांना ताब्यात घेण्यात आलं. ग्रॅटियनलाही ताब्यात घेण्यात आलं.
2004 मध्ये कोर्टात ग्रेटियनने बर्नाडेटसमोर तिच्या पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. यासाठी त्याने बर्नाडेटची माफीही मागितली होती. त्याचवेळी महिलेने ग्रेटियनला देखील माफ केलं. यामुळे ग्रेटियनला 19 वर्षांची शिक्षा झाली नाही. त्याला दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सोडण्यात आलं.
ग्रेटियन 10 वर्षे नजरकैदेत राहिला. या दरम्यान दोन्ही कुटुंबातील जवळीक वाढली. ग्रेटियनची मुलगी यांकुरिजे डोनाटा तिला मदत करण्यासाठी बर्नाडेटच्या घरी आली. हत्याकांडाच्या वेळी ती केवळ 9 वर्षांची होती. बर्नाडेटचा मुलगा आफ्रेड तेव्हा 14 वर्षांचा होता. डोनाटाने या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली म्हणाली की, या सगळ्या काळात माझा आणि आफ्रेडचा संपर्क वाढला. पुढे आम्ही चांगले मित्र झालो. मग आम्ही प्रेमात पडलो. अन् लग्नाचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या