Tinder वाला Love! 23 वर्षाची ‘ती’, 62 वर्षाचा ‘तो’, मॉडेल आणि बिल्डरची प्रेम कहाणी
'एजगॅप'मुळे सोशल मीडिया यूजर्स खूप टोमणे मारतात.
दोघांच्यात 39 वर्षांचा फरक आहे. दोघांची भेट टिंडरवर झाली. 23 वर्षीय मुलगी आणि तिच्या 62 वर्षांच्या जोडीदारासोबत अगदी तंतोतंत जुळून आलंय. एजगॅपकडे दुर्लक्ष करून हे जोडपं एकमेकांवर अतोनात प्रेम करतं. डेटिंग ॲप या जोडप्याची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये एक प्रकारचं कनेक्शन तयार झालं आणि गेल्या काही महिन्यांपासून हे जोडपं एकमेकांसोबत आहे.
23 वर्षीय मॉडेल विलो सिलास आणि 62 वर्षीय डेव्हिड सिमोनिनी यांची टिंडरवर भेट झाली. विलोच्या म्हणण्यानुसार, डेव्हिड ही तिची पहिलीच डेट होती.
विलोने सांगितले की, अवघ्या 1 तासात एकमेकांच्या प्रेमात पडलो. डेव्हिडने truly सांगितले, “हे एक अविश्वसनीय रिलेशनशिप होतं, आम्ही पटकन एकत्र आलो”
पहिल्या भेटीनंतर या कपलने स्वतः हे नातं सार्वजनिक केलं, तेव्हापासून दोघंही एकमेकांसोबत बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणून आहेत.
आता हे दोघंही एकमेकांसोबत फिरतात, रेस्टॉरंटमध्ये जाऊन कार्यक्रमांना हजेरी लावतात. डेविडने तिला ‘बॅकस्ट्रीट बॉईज’च्या कॉन्सर्टलाही नेलं, असं विलोने सांगितलं.
विलो म्हणाली की, जेव्हा ती पहिल्यांदा डेव्हिडला भेटली, तेव्हा तो जो काही बोलत होता त्याने ती प्रभावित झाली नाही, तिला डेव्हिडला एक व्यक्ती म्हणून जाणून घ्यायचे होते. ती डेव्हिडच्या वयाचा फारसा विचार करत नव्हती.
विलो म्हणाली की, सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वयातील फरकाबद्दल कोणीच काही बोलत नाही. पण, ‘एजगॅप’मुळे सोशल मीडिया यूजर्स खूप टोमणे मारतात.
काही लोक डेव्हिडला ‘शुगर डॅडी’ म्हणतात. बरेच लोक डेव्हिडला तिचे आजोबा आणि वडील देखील म्हणतात. त्याचबरोबर अनेक युझर्स विलोला टार्गेट करतात आणि म्हणतात की, डेव्हिडच्या पैशांमुळे तिचं प्रेम आहे.
हे जोडपे नकारात्मक टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करतं. डेव्हिडचे कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे आलिशान पेंटहाऊस आहे. इथे तो विलोबरोबर राहतोय.