VIDEO | पीपीई किटमध्ये डॉक्टरांना समजली भूत, रुग्ण महिलेचा आरडाओरडा, मजेदार व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये दिसतं की जेव्हा डॉक्टर त्यांच्या महिला पेशंटला भेटायला येतात, तेव्हा ती त्यांना पाहताच ओरडू लागते. त्यानंतर असे काही घडतं, की भीतीमुळे बाजूच्या रुग्णालाही घाम फुटला आणि आपला आजार विसरुन शेजारचा रुग्णही त्याच्या पलंगावरुन उठून बसला.

VIDEO | पीपीई किटमध्ये डॉक्टरांना समजली भूत, रुग्ण महिलेचा आरडाओरडा, मजेदार व्हिडीओ व्हायरल
पीपीई किटमध्ये डॉक्टर पाहून रुग्णाला घामटं
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 12:40 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे, मास्क आणि सॅनिटायझर्स ही सामान्य लोकांची दैनंदिन गरज बनली असताना, डॉक्टरांनाही रुग्णालयांमध्ये पीपीई किट घालणे आवश्यक झाले आहे. पण बऱ्याच वेळा हे पीपीई किट डॉक्टरांसाठी त्रासदायक ठरतात. रात्रीच्या अंधारात पीपीटी किट घातलेल्या डॉक्टरांना पाहून रुग्ण घाबरल्याची उदाहरणंही ऐकायला मिळत आहेत. असाच एक मजेदार व्हिडिओ अलीकडच्या काळात समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला रुग्ण डॉक्टरांना पाहून चक्क ओरडायला लागली.

सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ

व्हिडीओमध्ये दिसतं की जेव्हा डॉक्टर त्यांच्या महिला पेशंटला भेटायला येतात, तेव्हा ती त्यांना पाहताच ओरडू लागते. त्यानंतर असे काही घडतं, की भीतीमुळे बाजूच्या रुग्णालाही घाम फुटला आणि आपला आजार विसरुन शेजारचा रुग्णही त्याच्या पलंगावरुन उठून बसला.

काय आहे व्हिडीओमध्ये

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डॉक्टर त्यांचे कर्तव्य बजावत असताना रुग्णांना भेटायला आले होते, पण एक महिला रुग्ण त्यांना भूत समजून घाबरली आणि चक्क मोठ-मोठ्याने ओरडू लागली. महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या बेडवर झोपलेल्या रुग्णाचीही पाचावर धारण बसली, पण डॉक्टरांना पाहिल्यानंतर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

हा मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर गिड्डा कंपनी (Gidda Company) नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स मजेदार कमेंट्स करत आहेत. ‘पेशंटने पेशन्स गमावले, अशी कमेंट एकाने केली आहे. त्याचवेळी, दुसऱ्या युझरने लिहिले आहे, ‘असे दिसते की ती महिला डॉक्टरांना यमराज समजली.’ ‘भीतीपोटी शेजारचा माणूस पळून जाण्याच्या तयारीत होता’ असंही एकाने म्हटलं आहे. या व्हिडीओवर अनेक जणांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video | प्रवासासाठी विमानतळावर चक्क बिकिनीवर आली, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

ओsss शेठ नंतर ओsss सर, छोटा मुलगा म्हणतो ‘आठवण तुमची लय हो आली,’ व्हायरल गाण्याची धूम

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.