Vidhansabha Trending: आजी माजी थाटात एंट्री, बंडखोरांना कवितेत टोला त्यातच झाडी डोंगार हाटीलचं वेगळं अस्तित्त्व! चला बघुयात विधानसभा ट्रेंडिंग

निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहात अनेक किस्से घडले, कुणी मतमोजणी करताना अडखळलं, देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणेच कडक बोलले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुरून उरले.

Vidhansabha Trending: आजी माजी थाटात एंट्री, बंडखोरांना कवितेत टोला त्यातच झाडी डोंगार हाटीलचं वेगळं अस्तित्त्व! चला बघुयात विधानसभा ट्रेंडिंग
Narhari Jhirwal Shahajibapu PatilImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 1:24 PM

मुंबई: चला आज एकदम हॉट टॉपिकवरचे ट्रेंडिंग व्हिडीओज बघुयात. गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं (Maharashtra Assembly Speaker) पद हे रिक्त आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर हे निवडून आलेले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal) यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं. निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहात अनेक किस्से घडले, कुणी मतमोजणी करताना अडखळलं, देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणेच कडक बोलले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुरून उरले. या सगळ्यात काय झाडी काय डोंगर याचं एक वेगळं अस्तित्व होतं. बघुयात आजचं स्पेशल विधानसभा ट्रेंडिंग !

1) आजी माजी सगळेच थाटात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही दिमाखदार एंट्री बघा

हे सुद्धा वाचा

2) “काय झाडी, काय डोंगार..” चं सभागृहात वेगळं अस्तित्व!

अजूनही जो तो उठतोय, निसर्गातला आपला एखादा फोटो टाकतोय आणि त्याला कॅप्शन देतोय,‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’. आमदार शाहजीबापू पाटील यांनी आपल्या गावातल्या एका कार्यकर्त्याला फोन केला. फोनवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं गुवाहाटीमध्ये काय बाबा एक नंबर झाडं आहेत, डोंगर आहेत, हॉटेल आहेत.आता हे सांगताना त्यांनी जरा त्यांच्या गावाकडच्या शैलीत सांगितलं त्यामुळे ते वाक्य खूपच व्हायरल झालं. सगळीकडे व्हायरल झाल्यावर शहाजीबापू पाटील आता विधानभवनात पण व्हायरल झालेत. ते मत द्यायला उठले तसं सगळं विधानभवन ओरडू लागलं,”काय झाडी, काय डोंगार..”

3) बंडखोर आमदारांना कवितेतून टोला!

अनेक लोकांनी विधानभवनात टोला लागवण्याची संधी सोडलेली नाही. अगदी मत देताना सुद्धा आमदारांनी संधी सोडली नाहीये. बंडखोर आमदार कैलास गोरंट्याल यांनी बंडखोर आमदारांना कवितेतून टोला लगावला आहे.

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.