AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भयानक अपघात कसा टळला हे दाखवण्यात आले आहे.

Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?
truck accident viral video
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 3:47 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला लावतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भयानक अपघात कसा टळला हे दाखवण्यात आले आहे. (Truck come in front of little boy while crossing road video went viral on social media)

रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपल्याला आश्चर्यात पाडणारा आहे. हा व्हिडीओ एका महामार्गावरील आहे. या रस्त्यावर मोठमोठी वाहने ये-जा करत आहेत. या रस्त्यावर वाहनांची गर्दी असून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला तर लगेच अपघात होण्याची भीती आहे. व्हिडीओमध्ये ही भीती सत्यात उतरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोन शाळकरी मुलं दिसत आहेत. ही मुलं रस्ता ओलांडण्यासाठी धडपडत आहेत. समोरची बस पुढे गेल्यानंतर या मुलांनी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी रस्त्याच्या दुसऱ्या कडेला जाण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र, याच वेळेस समोर एक भला मोठा ट्रक आला आहे. या ट्रकचा वेग जास्त असून ट्रकचालकाला या वेगावर तत्काळ नियमंत्रण मिळवणे अशक्य आहे.

ट्रकचालकाच्या प्रसंगावधानामुळे मुलं वाचली

या व्हिडीओमध्ये रोड क्रॉस करताना मोठा ट्रक लहान मुलांच्या थेट अंगावर आला आहे. यातील एक मुलगा तर थेट ट्रकखाली येतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ट्रक चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत तत्काळ ब्रेक दाबले आहे. त्यामुळे व्डिडीओतील ट्रक हे भरधाव वेगात असले तरी, ते काही क्षणांत जागेवर थांबले आहे. ट्रकचालकामुळे दोन्ही मुलांचा जीव वाचला आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ 

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. मात्र, या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून लाईकही करत आहेत. हा व्हिडीओ jatt.life या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | मालकीन डान्स करताना कुत्राही थिरकला, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !

(Truck come in front of little boy while crossing road video went viral on social media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.