Twitter चे नवे मालक Elon Musk यांनी 13.6 किलो वजन कमी केल्याचं रहस्य सांगितलंय
एका युझरने त्याला विचारले की, इतके वजन कमी करण्यासाठी तू काय केलेस? एलन यांनी त्याला आपल्या आहाराविषयी सांगितले.
ट्विटरचे नवे मालक एलन मस्क कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी ते चर्चेत आले आहेत कारण त्यांनी 10 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. होय, त्यांनी ही माहिती ट्विटरवर एका युझरला रिप्लाय देताना दिलीये. एका युझरने त्याला विचारले की, इतके वजन कमी करण्यासाठी तू काय केलेस? एलन यांनी त्याला आपल्या आहाराविषयी सांगितले. त्यांनी पुढे लिहिले की, त्यांना आता निरोगी वाटत आहे. युझरने कमेंट करत त्याचं अभिनंदनही केलं आहे, त्याचं वजन कसं कमी झालं ते जाणून घेऊया.
ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी म्हटले आहे की, त्यांनी सुमारे 30 पौंड म्हणजे सुमारे 13.6 किलो वजन कमी केले आहे. एका युझरने लिहिले, “एलन! हे महान कार्य चालू ठेवा.”
ट्विटरवर आणखी एका युझरने एलनला विचारलं, “तू इतकं वजन कसं कमी केलंस?” त्याला उत्तर देताना मस्कने लिहिले की, उपवास, शुगरचं औषध आणि कोणतेही स्वादिष्ट जेवण माझ्या आयुष्यात नाही. ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी इंटरमिटेंट फास्टिंग हे यामागचं रहस्य असल्याचंही म्हटलं होतं.
त्यावेळी मस्क यांनी एका चांगल्या मित्राच्या सल्ल्यानुसार इंटरमिटेंट फास्टिंग अंगिकारली असल्याचं सांगितलं होतं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने असेही उघड केले होते की अधूनमधून उपवास केल्याने त्याने नऊ किलो वजन कमी केले आहे आणि त्याला खूप निरोगी वाटत आहे.