Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये दुचाकीवरुन वेगात निघण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या चांगलाच अंगलट आलाय. तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
मुंबई : आजकालच्या तरुण मंडळींना वेग फार आवडतो. भरधाव वेगात दुचाकी तसेच कार चालवणे तरुणांना भूषणावह वाटते. मात्र, अशा प्रकारांमुळे कधी कधी काहीतरी वेगळंच होऊन जातं. सध्या चर्चेत आलेल्या व्हिडीओमध्ये त्याची प्रचिती आली आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीवरुन वेगात निघण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या चांगलाच अंगलट आलाय. तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. (two boys riding bike with hurry accident video went viral on social media)
दोन तरुण दुचाकीवर घाईगडबडीत बसले
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा तरुणांना चांगलाच मेसेज देतोय. या व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी सामानाची खरेदी केली आहे. सामान खरेदी केल्यानंतर ते घाईघाईत कुठेतरी निघत आहेत. त्यासाठी ते दुचाकीवर घाईगडबडीत बसलेयत. मागे बसलेल्या तरुणाने तर आपले पाय समोरच्या तरुणाच्या अंगावर टाकल्याचं दिसतंय.
दुचाकीचे समोरचे चाक जागेवरच उचलले गेले
दुचाकीवर बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीने सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याच घाईने व्हिडीओतील दोघांचा घात केलाय. दुचाकी सुरु केल्यानंतर तिचे समोरचे चाक जागेवरच वर उचलले गेले आहे. यामुळे दुचाकी पलटली आहे. परिणामी दोन्ही तरुण दुचाकीखाली दबले आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
तरुणांचे नशीब बलवत्तर, पण व्हिडीओची सगळीकडे चर्चा
नशीब बलवत्तर म्हणून ही दुचाकी तरुणांच्या थेट अंगावर पडली नाही. मात्र, या अपघातात दोन्ही तरुणांना चांगलीच दुखापत झाली असणार. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओला पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच काही लोक या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअरसुद्धा करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.
इतर बातम्या :
Video | रस्त्यावर, पुलावर पाणीच पाणी, बसचे झाले जहाज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Video | परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्टंट, महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘तुस्सी बडे ग्रेट हो’
श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात https://t.co/fdDgMgpwYH @Navimumpolice @OfficeofUT @AjitPawarSpeaks #navimumbai #apmc #APMCMarket #shravanmaas #fruits #FruitsRate
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
(two boys riding bike with hurry accident video went viral on social media)