Video | सापाला तोंडात धरून गोल-गोल फिरवलं, कुत्र्याच्या पिल्लांची करामत एकदा पाहाच !

सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कुत्र्याची पिल्लं दिसत आहेत. या पिल्लांनी केलेली करामत पाहण्यासारखी आहे.

Video | सापाला तोंडात धरून गोल-गोल फिरवलं, कुत्र्याच्या पिल्लांची करामत एकदा पाहाच !
VIRAL VIDEO OF puppies
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 4:43 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर प्राण्यांचे व्हिडीओ तर हमखास व्हायरल होतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कुत्र्याची पिल्लं दिसत आहेत. या पिल्लांनी केलेली करामत पाहण्यासारखी आहे. (Two Puppies playing together with snake video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्याची दोन पिल्लं दिसत आहेत. ही पिल्लं अतिशय़ गोंडस असून ती मजेत खेळताना दिसतायत. विशेष म्हणजे ते काही एकटे खेळत नसून त्यांनी खेळताना एका मोठ्या सापाला वेठीस धरलं आहे. या सापाला ते आपल्या तोंडात पकडून मस्तपैकी खेळत आहेत.

दोन पिल्लांची सापासोबत मस्ती

आपल्याला माहिती आहे की, साप हा विषारी प्राणी आहे. सर्वच साप हे विषारी नसले तरी काही सापांच्या दंशामुळे मृत्यू ओढावू शकतो. मात्र, असे असले तरी व्हिडीओतील कुत्र्याची पिल्लं कसलीही तमा न बाळगता अतिशय मजेत खेळत आहेत. या दोन्ही पिलांच्या तावडीतून सुटण्यासाठी हा साप प्राणपणाने प्रयत्न करतो आहे. मात्र, काहीही झालं तरी कुत्र्याची पिल्लं सापाला काही सोडत नाहीयेत. यातील एक पिल्लू तर शेपटीला आपल्या तोंडात पकडून सापाला गोल-गोल फिरवत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हे दृश्य खरंच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहून मला हसू आवरत नाहीये, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर ही पिल्लं कुत्र्यासोबत खेळत आहेत की भांडत आहेत; हे समजत नाहीये, असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला @tweetbyjounralist या व्टिटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले असून लोक त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | पिंजऱ्यात डांबून जंगलात आणलं, बाहेर आल्यानंतर वाघाने काय केलं ? एकदा पाहाच

Video | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल

Video | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ

(Two Puppies playing together with snake video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.