या व्यक्तीला बघून लोकं म्हणाले, “किती तो निरागसपणा!” हेल्मेट घालणारी ही व्यक्ती झाली फेमस
आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. या क्लिपने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले. त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले.
इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहून तुम्हाला हसू येईल, पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की तो पाहिल्यानंतर लोक असा विचार कसा करू शकतात? असा विचार येतो. ऑनलाइन समोर आलेल्या एका क्लिपमध्ये एका गाडीवर भाजी विकणाऱ्या एका व्यक्तीने वाहतूक पोलिसांचा दंड टाळण्यासाठी हेल्मेट घातलं होतं. होय, तुम्ही बरोबर वाचले. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटिझन्सनी हसून विक्रेत्याच्या निरागसपणाचं कौतुक केलंय.
भागवत प्रसाद पांडे नावाच्या पोलिसाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये भागवत प्रसाद पांडे आणि एक अज्ञात भाजी विक्रेत्यामध्ये संभाषण सुरु आहे.
विक्रेत्याला हेल्मेट का घातले आहे, असे विचारले असता, पोलिस बिना हेल्मेट लोकांना अडवत आहेत, असे उत्तर त्याने दिले.
मात्र, भागवत प्रसाद पांडे यांनी त्यांना समजावले की, त्यांच्यासारख्या चारचाकी वाहनाला हेल्मेट घालण्याची गरज नाही. रहदारी टाळण्यासाठी त्याने विक्रेत्याला फूटपाथवरून चालण्यास सांगितले.
ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भीती नाही, जनजागृतीची गरज आहे!’ हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.
डर नहीं.. जागरूकता चाहिए..! pic.twitter.com/Lehme6zd6p
— Bhagwat Prasad Pandey (@bhagwat__pandey) October 8, 2022
आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. या क्लिपने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले. त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले.
काही वापरकर्त्यांनी पोलिसाचा विनयभंग झालाय असं म्हटलंय. काहींनी विक्रेत्याच्या निरागसतेचे कौतुक केले, तर काहींनी त्यास कायद्याची भीती असल्याचे म्हटले.