Video : महाकाय हिम अस्वलावर कुत्र्याचा हल्ला, व्हिडीओमध्ये पाहा कोण पडलं कोणावर भारी
सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा आणि हिम अस्वलाच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक निडर कुत्रा कसा महाकाय हिमअस्वलावर हल्ला करतो हे आश्चर्यचकित करणारे आहे.
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपण सारेच पाहत असतो ते लाईक करुन शेअर करत असतो. पण काही प्राण्याचे व्हिडीओ हे मजेशीर नसून हैरान करणारे असतात. कधीकधी काही शिकारी प्राणी इतर प्राण्यांवर कशा क्रुरतेने हल्ला करतात हे पाहून थरकाप उडतो. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये जगातील सर्वांत मोठ्या शिकारी प्राण्यांमध्ये मोजल्या जाणाऱ्या हिम अस्वलावर एक कुत्रा हल्ला करतो. या व्हिडीओला पाहून सगळेच हैराण होत असून एक कुत्रा महाकाय हिम अस्वलावर कसा हल्ला करु शकतो. हे खरंच आश्चर्यचकित करणारे आहे. (Video of Dog Attacking Polar Bear Went Viral On Social Media)
या व्हिडीओमध्ये बर्फाळ प्रदेशात एक हिम अस्वल (Polar Bear) असते. ज्याच्यावर एक पाळीव कुत्रा हल्ला करतो. अस्वल कुत्र्यावर हल्ला करणार असते तेव्हाच कुत्रा प्रतिवार करत अस्वलाचं नाक जबड्यात पकडतो. अस्वल ही प्रतिकार करते पण ज्या वेगात आणि धाडसीपणे कुत्रा हल्ला करतो त्यासमोर अस्वलाला काहीच करता येत नाही. अगदी न घाबरता कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची नेटकरी कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
लाखो नेटकऱ्यांनी पाहिला व्हिडीओ
हिम अस्वल आणि कुत्र्याच्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर wildanimals_2 या अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. थापर्हैयंत 1.6 लाखाहूंन अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी लाईक, कमेंट करत व्हिडीओ शेअरही केला आहे.
इतर बातम्या :
Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…
Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा