…आणि बाटलीतलं सर्व पाणी संपवतं माकड, प्राण्यावरील प्रेमाचा Video होतोय Viral

अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस माकडाला पाणी देताना दिसत आहे.

...आणि बाटलीतलं सर्व पाणी संपवतं माकड, प्राण्यावरील प्रेमाचा Video होतोय Viral
माकडाला पाणी पाजताना युवक
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:49 PM

तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे अत्यंत पवित्र कार्य मानले जाते. हे शिक्षण आपल्याला आपल्या पालकांकडून लहानपणीच मिळते. आजही बरेच लोक त्याचे पालन करतात, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना याची पर्वा नाही. आपण कुठेतरी फिरायला गेलात तर साहजिकच पाण्याची बाटली घेऊन जातो आणि कुणी पाणी मागितलं तर त्याला आपण नाही म्हणत नाही. आपण एखाद्याला मदत करणे हे एक चांगले काम आहे. जनावरांनाही पाणी पिऊन अनेकजण प्रेमभाव दाखवतात. असे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस माकडाला पाणी देताना दिसत आहे.

बाटलीतलं सर्व पाणी पितो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला पाणी देताना दिसत आहे. माकडालाही खूप तहान लागली आहे. तो हळूच बाटलीतील सर्व पाणी पितो. लोक सहसा माकडांच्या जवळ जायलाही घाबरतात, तर ती व्यक्ती बिनदिक्कत हाताने माकडाला पाणी देत ​​आहे, जसे लहान मुलाला पाणी दिले जाते. हा एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे, जो लोकांना खूप आवडतोय.

IAS अधिकाऱ्यानं केला शेअर हा शानदार व्हिडिओ जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, जो IAS अधिकारी सोनल गोयल यांनी रिट्विट केला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1500हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

यूझर्सकडून कौतुक त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने ‘पाणी हे जीवन आहे’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूझरने ‘विश्वातील सर्व जीवांवर प्रेम करणे आपले कर्तव्य आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक यूझर्सनी कमेंट करून व्हिडिओला खूप चांगला असल्याचे म्हटले आहे.

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video

VIDEO : कुत्र्यांचा असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर होतोय Viral

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.