Viral: मजा येत नाही…असं लिहून नोकरी सोडली! रेसिग्नेशन लेटर फेमस
मजा येत नाही हे कारण जरी मस्करी वाटत असलं तरी ती एक खूप गंभीर बाब आहे जी आपण सगळ्यांनीच गांभीर्यानं घ्यायला हवी. खरंय नाही का?
बऱ्याच वेळा राजीनाम्याच्या (Resignation Letter) पोस्ट वायरल (Post Viral) होत असतात. आजकाल लोकांची नोकरी सोडण्याची कारणं बदलत चालली आहेत. कधी कुणी काय म्हणून नोकरी सोडतं तर कुणी काय. व्यावसायिक हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केलीये ज्यात एका व्यक्तीने आपल्या राजीनाम्यात कामात मजा येत नसल्याचं कारण देत नोकरी सोडलीये. मजा येत नाही हे कारण जरी मस्करी वाटत असलं तरी ती एक खूप गंभीर बाब आहे जी आपण सगळ्यांनीच गांभीर्यानं घ्यायला हवी. खरंय नाही का? कामात जर मजा नसेल तर माणूस काम करेलच कसा आणि जर काम होत नसेल नोकरी सोडणं तर भागच आहे. या व्यक्तीनेही अगदी तसंच केलं. त्याला कामात मजा येत नव्हती त्याने राजीनाम्यातही तेच लिहीलं. हर्ष गोएंका सारख्या मोठ्या व्यावसायिकाला या घटनेचं, राजीनाम्याचं गांभीर्य कळतंय…आपल्याला कधी कळणार?
हर्ष गोएंका यांची ट्विटर पोस्ट
जी पोस्ट हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शेअर केलीये त्यात एका राजेश नावाच्या व्यक्तीने राजीनामा लिहीलाय, ज्या राजीनाम्यात राजेश लिहीतो,” प्रिय सर, मी राजीनामा देतोय,मजा येत नाहीये!”. ही पोस्ट शेअर करताना गोएंका म्हणतात, हे पत्रं छोटं पण खूप विचार करण्यासारखं आहे. ही एक खूप गंभीर समस्या आहे ज्याकडे आपण सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं.”
This letter is short but very deep. A serious problem that we all need to solve… pic.twitter.com/B35ig45Hhs
— Harsh Goenka (@hvgoenka) June 19, 2022
रेसिग्नेशनचा फोटो वायरल
इतके वर्ष/ दिवस काम केलेल्या ठिकाणाला तुम्ही टाटा बाय बाय कसं करता याला फार महत्त्व असतं. या एका लेटरमुळे तुम्ही कायमचे लक्षात राहू शकता.काही लोकांना ह्यातलं काहीच पडलेलं नसतं. ते मनाला वाट्टेल ते त्या रेसिग्नेशन लेटरमध्ये लिहीतात आणि मग ते लेटर वायरल होतं. सध्या सोशल मीडियावर एक रेसिग्नेशनचा फोटो वायरल (Photo Viral) होत आहे, जो अत्यंत साधा आणि छोटा आहे. हे लेटर आपण वाचायला सुरुवात करताच लगेच संपेल, कारण ते अगदी छोटंसं आहे आणि हो खूप विनोदी देखील आहे.
Short and sweet. pic.twitter.com/KYXYgeq2tl
— Kaveri ?? (@ikaveri) June 14, 2022
‘प्रिय सर,…’
या कर्मचाऱ्याने आपल्या रेसिग्नेशन लेटरमध्ये लिहीलं आहे, ‘प्रिय सर, विषय : राजीनामा, बाय बाय सर.’ असं लिहीत त्याने स्वत: या लेटरवर सही केलीये. या वायरल राजीनाम्याबाबत नेटकऱ्यांनी आपली मतं मांडलीयेत. काही युजर्सनी हे रेसिग्नेशन लेटर पाहून त्यांचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले. एका युझरने लिहिले की, “गेल्या आठवड्यात मला राजीनामा मिळाला, जो आणखी लहान होता. ज्या दिवशी त्याला पगाराचा धनादेश मिळाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा राजीनामा मला व्हॉट्सॲपवर मिळाला होता.”