गजब निकाल, विद्यार्थ्याला गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीमध्ये 200 पैकी 111 गुण, मार्कशीट व्हायरल
Viral news: नवीन गुणपत्रकात वंशीबेन हिला गुजरातीमध्ये 200 पैकी 191 आणि गणितामध्ये 190 गुण मिळाले. बाकी विषयामध्ये काहीच बदल झाले नाही. एकूण 1000 पैकी 934 गुण तिला दिले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गजब निकाल, विद्यार्थ्याला गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीमध्ये 200 पैकी 111 गुण, मार्कशीट व्हायरल
फेब्रुवारी-मार्च महिना परीक्षांचा असतो. त्यानंतर मे आणि जून महिना निकालाचा असतो. विद्यार्थी दहावी, बारावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. आता शाळेचे निकाल लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक गुणपत्रक चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामध्ये गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीमध्ये 200 पैकी 111 गुण विद्यार्थ्याला दिले आहेत. हे गुण पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. पालकांनी ही चूक शाळेच्या लक्षात आणून दिल्यानंतर मार्कशीटमध्ये सुधारणा करुन नवीन गुणपत्रक देण्यात आले. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु नेटकऱ्यांनी चांगले मीम्स त्या मार्कशीटचे तयार केले आहे.
कोणत्या शाळेतील प्रकार
सोशल मीडियावर एक गुणपत्रक चांगलेच व्हायरल होत आहे. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील कृष्णा या गावातील हे गुणपत्रक आहे. चौथी वर्गात शिकवणाऱ्या वंशीबेन मनीषभाई हिचा हा निकाल आहे. त्याचा हा निकाल पाहून कुटुंब आणि मित्र परिवारास आश्चर्याचा धक्का बसला. कारण वंशीबेन हिला गुजराती या विषयामध्ये 200 पैकी 211 तर गणित या विषयामध्ये 200 पैकी 212 गुण मिळाले. शाळेच्या लक्षात हा प्रकार आणून दिल्यानंतर नवीन मार्कशीट तिला देण्यात आले.
गुजरात मॉडलमे बच्चे अब 200 मे से 211, 212 मार्क्स भी ले पाते है @BhavikaKapoor5 @ShadowSakshi pic.twitter.com/t4pxlZ73OM
— B.Singh (@Singh76723975) May 6, 2024
नवीन गुणपत्रकात असे झाले गुण
नवीन गुणपत्रकात वंशीबेन हिला गुजरातीमध्ये 200 पैकी 191 आणि गणितामध्ये 190 गुण मिळाले. बाकी विषयामध्ये काहीच बदल झाले नाही. एकूण 1000 पैकी 934 गुण तिला दिले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चूक कोणाकडून झाली, त्याची चौकशी आता करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर गुजरात मॉडल
सोशल मीडियावर बी.सिंग नावाच्या युजरने हे मार्कशीट ट्विट केले आहे. गुजरात मॉडल हे कॅप्शन देऊन हे मार्कशीट दिले आहे. त्यावर अनेकांनी लाईक आणि कॉमेंट केल्या आहेत.