Viral: हे म्हणतं माझीये, ते म्हणतं माझीये! एसपी म्हणतात,”अब तुम DNA टेस्ट से डरो!”

कमाल आहे हे! उत्तर प्रदेशातल्या एका शेतकऱ्याची म्हैस हरवली. ती म्हैस लहान असतानाच हरवली त्याला नंतर तीन महिन्यांनी ती म्हैस सापडली सुद्धा पण लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांत तक्रार करून सुद्धा पुढे काहीच करता आलं नाही.

Viral: हे म्हणतं माझीये, ते म्हणतं माझीये! एसपी म्हणतात,अब तुम DNA टेस्ट से डरो!
हे म्हणतं माझीये, ते म्हणतं माझीये! Image Credit source: The Weekly Times
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 10:46 AM

मेरठ: माणसांची DNA टेस्ट (DNA Test)  केली जाते हे आपण ऐकून आहोत. पण कधी ऐकलंय का की प्राण्यांची ओळख पटवायला देखील DNA टेस्ट केली जातीये. कधी कुणी विचार करू शकलं असेल का की सायन्स इतक्या पुढे जाऊ शकतं की एखाद्या माणसाचा हरवलेला पाळीव प्राणी सुद्धा सायन्सच शोधून देऊ शकतो. कमाल आहे हे! उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) एका शेतकऱ्याची म्हैस हरवली. ती म्हैस लहान असतानाच हरवली (Stolen Buffalo)त्याला नंतर तीन महिन्यांनी ती म्हैस सापडली सुद्धा पण लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांत तक्रार करून सुद्धा पुढे काहीच करता आलं नाही. काही महिने गेले आणि अर्थातच ती म्हैस मोठी झाली. मग आता त्या म्हशीला ओळखायचं कसं? ज्याच्याकडे ती म्हैस आहे तो शेतकरी सुद्धा “म्हैस माझीच” असा दावा करतोय. ज्याची ती म्हैस हरवलीये त्याचाकडे त्या म्हशीची आई सुद्धा आहे. अशा वेळी जिल्ह्याच्या एस.पी ने शक्कल लढवली. DNA टेस्ट करण्याचा आदेश दिलाय. आता या म्हशींची DNA टेस्ट होणार आहे आणि निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.

दोघांची DNA चाचणी करण्याचे आदेश

चन्द्रपाल कश्यप या एका शेतकऱ्याने तक्रार केली होती की, 25 ऑगस्ट 2020 रोजी त्याच्या गोठ्यातून तीन वर्षांच्या म्हशीचे नर बछडे चोरीला गेले होते. हे नंतर नोव्हेंबर, 2020 मध्ये सहारनपूरच्या बीनपूर गावात आढळले परंतु कथित मालक सतबीर सिंहने म्हैस आपली असल्याचा दावा करत त्यापासून विभक्त होण्यास नकार दिला. कोव्हिड-19 महामारीच्या काळात हे प्रकरण मागे पडले. आता शामली जिल्ह्याचे एसपी सुकृति माधव योग्य मालकाचा शोध घेण्यासाठी आई म्हैस (जी अजूनही चन्द्रपाल कश्यपकडे आहे) आणि सहारनपूर-आधारित वासरू ( जे कथित मालकाकडे आहे आणि आता पूर्णपणे प्रौढ आहे) या दोघांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याला ओळखण्यासाठी मला आणखी काय हवंय?

“खरा मालक कोण आहे हे शोधून काढणं हे खरंच एक आव्हान होतं. पण कश्यपने आपल्या ताब्यात बछड्याची आई असल्याचा दावा केल्यामुळे आम्ही डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला”, अशी माहिती शामलीचे एसपी, सुकृती माधव यांनी दिली. आपली म्हैस कशी ओळखली, हे सांगताना कश्यप म्हणाले, “माणसांप्रमाणे प्राण्यांचीही वैशिष्ट्ये वेगळी आहेत. प्रथम, त्याच्या डाव्या पायावर एक डाग आहे. तसेच शेपटीच्या टोकाला पांढरा पॅच असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची आठवण. जेव्हा मी जवळ गेलो, तेव्हा त्याने मला ओळखले आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याला ओळखण्यासाठी मला आणखी काय हवंय?”

हे सुद्धा वाचा

चाचणी गुजरात किंवा दिल्लीस्थित लॅबमध्ये

दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिकारी अरुण कुमार म्हणाले, “गुरांची डीएनए चाचणी होतीये असं कधी ऐकलं जात नाही आणि ती असामान्य आहे. यूपीमध्ये अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही जिथे प्राण्यांची अशा प्रकारची चाचणी केली जाते. आम्ही पशुसंवर्धन विभागाकडून ही प्रक्रिया शिकलो आणि त्यांचे पशुवैद्यक गुरुवारी नमुने घेण्यासाठी आले. आता त्यांची चाचणी गुजरात किंवा दिल्लीस्थित लॅबमध्ये केली जाईल.”

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.