VIDEO : वायू वेगाने रेल्वे फाटक पार करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार पठ्ठ्याचं हाल काय झालं बघाच!
Viral Video : फाटक बंद होत असताना खालून निघून जाऊ असं या पठ्ठ्याला वाटलं. अर्धवट फाटकखालून निघून जाण्याचा प्रयत्न या दुचाकीस्वाराने केला. मात्र हा पठ्ठ्या वेगाने आला आणि थेट फाटकाच्या आडव्या दांडक्याला जोराने धडकला.
मुंबई : घाई गडबडीचं काम संकटात टाकतं असं म्हटलं जातं. जल्दी का काम शैतान होता है, असं हिंदीत म्हणतात. कारण घाईघाईने उरकलेली कामं नुकसानीची ठरतात. असे अनेक व्हिडीओ (Social media Video) आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यामध्ये घाई गडबडीने केलेली कामं पूर्ण होण्याऐवजी नुकसानच करणारी ठरतात. इन्स्टाग्रामवर सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराला त्याची घाई-गडबड किती महागात पडली हे दिसतं.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
या व्हिडीओमध्ये एक रेल्वे फाटक दिसतो. रेल्वे येण्यापूर्वी फाटक बंद होत आहे. मात्र अतिघाई झालेल्या दुचाकीस्वाराला थांबायला वेळ नसल्याचं दिसतं. त्याआधी फाटक बंद होण्यापूर्वी अर्धवट असताना एक कार आणि एक बाईक निघून जाते. मात्र एका दुचाकीस्वाराला वाटलं आपणही पुढे निघून जाऊ. त्यामुळे त्या पठ्ठ्यानेही दुचाकी तशीच पुढे दामटली.
फाटक बंद होत असताना खालून निघून जाऊ असं या पठ्ठ्याला वाटलं. अर्धवट फाटकखालून निघून जाण्याचा प्रयत्न या दुचाकीस्वाराने केला. मात्र हा पठ्ठ्या वेगाने आला आणि थेट फाटकाच्या आडव्या दांडक्याला जोराने धडकला.
ही धडक इतकी जोराची होती की खांबाला धडकताय दुचाकीस्वार जोरात खाली आपटतो. त्याला मोठी दुखापत होते. तरीही हा पठ्ठ्या उठून उभा राहतो. त्याला नेमकी किती दुखापत झाली, हाडं खिळखिळी झाली का हे आता तो दुचाकीस्वारच सांगू शकेल.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अतिघाई संकटात नेई म्हणतात ते खोटं नाही हे यावरुन सिद्ध होतंय, अशीच नेटकऱ्यांची भावना आहे.
VIDEO : दुचाकीस्वाराला अती घाई नडली
View this post on Instagram
संबंधित बातम्या