Video: माणूसच नाही, प्राणीही एकमेकांची मदत करतात, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून म्हशीचं कौतुक!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाखाली एक कासव उलटं पडले आहे. कासव उलट पडल्यानंतर त्याला चालता येत नाही आणि ते स्वत:हून सरळ होऊन चालूही शकत नाही. पण तितक्यात...

Video: माणूसच नाही, प्राणीही एकमेकांची मदत करतात, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून म्हशीचं कौतुक!
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 3:59 PM

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी काही लगेच व्हायरल होतात आणि काही व्हिडीओबद्दल लोकांना माहितीही नसते. जे व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होतात, खरं तर लोकांना ते खूप आवडतात. विशेषत: प्राण्यांचे व्हिडिओ, लोकांना ते खूप गोंडस वाटतात. तुम्ही माणसं प्राण्यांना मदत करताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी म्हशीला इतर प्राण्यांना मदत करताना पाहिले आहे का? कदाचित तुम्ही पाहिले नसेल, कारण अशी दृश्यं क्वचितच पाहायला मिळतात, पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक म्हैस एका कासवाला मदत करताना दिसत आहे. (Viral Video Buffalo saving a tortoise by turning it around amazing video Animal Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाखाली एक कासव उलटं पडले आहे. कासव उलट पडल्यानंतर त्याला चालता येत नाही आणि ते स्वत:हून सरळ होऊन चालूही शकत नाही. पण, इथंच त्याच्या मदतीला एक म्हैस येते. ही म्हैस आपल्या शिंगाच्या सहाय्याने त्या कासवाला सरळ करण्याचा प्रयत्न करते. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर या कासवाला सरळ करण्यात ही म्हैस यशस्वी होते.

हा सुंदर छोटा व्हिडीओ कुठला आहे हे माहित नाही, पण हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयात शूट करण्यात आल्याचे दिसतं. म्हशीच्या मागे 2-3 झेब्राही उभे असल्याचे दिसतात. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोक म्हशीचे खूप कौतुक करत आहेत, कारण सहसा माणुसकी माणसांकडून दाखवली जाते, पण इथे एका म्हशीने अप्रतिम माणुसकी दाखवली आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सगळे दयाळू असतात… इथं म्हैस कासवाला सरळ करुन त्याचा जीव वाचवत आहे’. हा जबरदस्त व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडिओवर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने या म्हशीला माणसांपेक्षा जास्त दयावान असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘सध्या फक्त प्राण्यांकडून शिकण्याची गरज आहे, कारण माणसांनी माणुसकी गमावली आहे’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने ‘चांगलं काम करा आणि विसरुन जा’ अशी कमेंट केली आहे.

हेही पाहा:

Video: 2 हिंस्र प्राण्यांच्या भांडणात काळविटाने आपला जीव वाचवला, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक!

Video: भाऊ देशाचं रक्षण करताना शहिद, बहिणीची पाठवणी करायला CRPF चे जवान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.