Viral Video: दिवंगत वडिलांचा पुतळा बघून माहेश्वरी भावुक! तामिळनाडूचा व्हायरल व्हिडीओ भारावून टाकणारा

मग पुढे काय झालं असेल सांगयची गरज आहेका? आपल्या वडिलांना बघून मुलगी इतकी रडली, इतकी रडली की हे दृश्य बघून लग्न मंडपातील प्रत्येक जण भावुक झाला होता.

Viral Video: दिवंगत वडिलांचा पुतळा बघून माहेश्वरी भावुक! तामिळनाडूचा व्हायरल व्हिडीओ भारावून टाकणारा
दिवंगत वडिलांचा पुतळा बघून माहेश्वरी भावुक!Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:36 AM

तामिळनाडू: मुलगी आणि वडिलांचं नातं हे शब्दात सांगता न येणारं! मुलीला आईपेक्षा जास्त वडिलांचा लाड, वडिलांचं प्रेम, वडिलांचाच सॉफ्ट कॉर्नर असतो अगदी आयुष्यभर. हे वास्तव कुठलीही मुलगी नाकारू शकत नाही. मुलीच्या लग्नातले (Marriage) सुद्धा अनेक व्हिडीओ वायरल होतात ज्यात जास्तीत जास्त तर मुलगी आणि मुलीचे वडील असेच ते व्हिडीओ असतात. कधी डान्स करताना, कधी खूप रडताना, कधी खूपच क्युट व्हिडीओज वायरल (Viral Video)  होतात. हे व्हिडीओ अगदी लक्षात राहण्यासारखे असतात. असाच एक एकदम भारावून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वायरल झालाय. दिवंगत वडिलांचा मेणाचा पुतळा या लग्नात नवरीच्या भावाने आणला. मग पुढे काय झालं असेल सांगयची गरज आहेका? आपल्या वडिलांना बघून मुलगी इतकी रडली, इतकी रडली की हे दृश्य बघून लग्न मंडपातील प्रत्येक जण भावुक झाला होता. इतकंच काय आमची खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ बघून रडाल.

पुतळा बघून नवरीला अश्रू अनावर

तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील थिरुकोविलूर भागात असलेल्या थानाकानंदल गावात ही अनोखी घटना घडली. या गावात राहणारे सुब्रमण्यम अवुला यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. अलीकडेच सुब्रमण्यम यांची मुलगी माहेश्वरी हिचं थाटामाटात लग्न झाले. लग्नात वडील आपल्या सोबत नसणार यामुळे माहेश्वरी खूप दुःखी होती. त्यामुळे माहेश्वरीचा भाऊ आणि आई यांनी तिला लग्नाची खास भेट देण्याचे ठरवले. त्यांनी माहेश्वरीच्या वडिलांचा मेणाचा पुतळा बनवण्याचे ठरवले. वडिलांचा पुतळा जेव्हा मंडपात आला तेव्हा महेश्वरीचा विश्वासच बसेना.वडिलांचा पुतळा बघून तिला अश्रू अनावर झाले.

हे सुद्धा वाचा

पुतळा बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी

पुतळा कर्नाटक मध्ये तयार करण्यात आलाय. तो बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. जेव्हा माहेश्वरी लग्न मंडपात आली तेव्हा तिच्या वडिलांचा मेणाचा पुतळा पाहून तिला धक्का बसला. बराच वेळ ती पुतळ्याकडे एकटक बघत राहिली. त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. ती पुतळ्याच्या पायाजवळ बसून बराच वेळ रडत होती. हे संपूर्ण दृश्य खूपच भावुक करणारे होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.