VIDEO : स्टंटबाजाचा व्हिडिओ पाहून युझर्स म्हणाले, काय, निघाली ना हिरोगिरी?
सोशल मीडिया(Social Media)मध्ये चर्चेत राहण्यासाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. आता व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप पाहा.
सोशल मीडिया(Social Media)मध्ये चर्चेत राहण्यासाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. पण या विश्वात प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही वेळा लोक असे काही करतात, की ते प्राणघातकही ठरू शकतं. विशेषत: जेव्हा तुम्ही स्टंट (Stunt) व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हालाही असेच काहीसे वाटेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हिडिओ समोर आलाय, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आधी त्या मुलाबद्दल सहानुभूती वाटेल, नंतर म्हणाल, काय, निघाली ना हिरोगिरी?
सराव न करता स्टंट तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्ही एकापेक्षा एक स्टंट व्हिडिओ पाहिले असतील. काही वेळा धोकादायक स्टंट करताना लोकांना जीव गमवावा लागतो. एखाद्या व्यावसायिक व्यक्तीनं ते केलं तर त्यात धोका नाही, कारण त्याचा त्यांना सराव असतो. मात्र काही लोक सराव न करता स्टंट करतात. आता व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप पाहा.
तोल जातो एक मुलगा रस्त्यावर हात फिरवत बाइक (Bike) चालवत आहे. हे पाहून पुढच्याच क्षणी त्या मुलाचं काहीतरी होणार हे नक्की, असं वाटत राहतं. तो रस्त्याच्या कडेला उभ्या गाडीला कट मारून निघण्याचा कसा प्रयत्न करतो ते बघू शकतो. यादरम्यान मुलगा स्टाइल मारण्याच्या नादात बाइकचं पुढचं चाक उचलतो, मात्र त्याचा तोल बिघडतो आणि तो रस्त्यावर पडतो. सुदैवानं मुलानं हेल्मेट घातलं होतं, अन्यथा कोणतीही अनुचित घटना घडू शकली असती. चला, पाहू या हा व्हिडिओ…
View this post on Instagram
लाइक आणि कमेंट्स हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर gui_moreyra नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. 9 डिसेंबर रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केलंय. त्याचबरोबर डझनभर लोकांनी यावर आपल्या कमेंटही दिल्यात.