AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : नात म्हणाली लग्नासाठी मुलगा मिळेना, आजीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

व्हिडीओत दिसणाऱ्या या मुलीला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. या गोष्टीचा उल्लेख तिनं आपल्या आजीकडे केला. आजी म्हणाली...(Viral Video of Granddaughter and grandmother)

Viral Video : नात म्हणाली लग्नासाठी मुलगा मिळेना, आजीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 12:25 PM
Share

मुंबई : सोशल मीडियाच्या(Social Media) या जगात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. इथं रात्रभरात अनेकांचं भविष्य बदलतं. तर काही व्हिडीओ पाहून लोक प्रचंड हसतात. तर सध्या सोशल मीडियावर एक आजी आणि नातीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. शिवाय लोकांमध्ये हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय आणि लोक या व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत.

काय आहे व्हिडीओ

व्हिडीओत दिसणाऱ्या या मुलीला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. या गोष्टीचा उल्लेख तिनं आपल्या आजीकडे केला. यावर आजीनं अशा काही सूचना दिल्या, ज्यानं लोकांची मनं जिंकली आणि आता लोक आजीचं जोरदार कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी नातीला लग्न करायला सांगते. यावर मुलगी म्हणते की लग्नासाठी तिला कोणताही मुलगा सापडत नाहीये. यावर आजी मजेदार पद्धतीने उत्तर देते की, एकदा तू तयारी करुन रस्त्यावर जा, मग बघ काय होतं?. त्यावर मुलगी म्हणते की मी आता रस्त्यावरुनच घरी आली आहे. मग आजी गंमतीनं म्हणते मग किती मुलं मेले? तुम्हीही हा मजेदार व्हिडीओ पाहा…

पाहा व्हिडीओ (See Video)

मन प्रसन्न करणारा आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ

तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच मजा आली असेल. अनेकांकडून या दोघींच्या व्हिडीओचं कौतुक होतंय. हा व्हिडीओ व्हेरिएटाजॅगलन नावाच्या अकाउंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच एक मजेदार कॅप्शन देखील लिहिलं गेलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘आजी कधीच चुकीची असू शकत नाही’. तर दुसऱ्यानं लिहिलं, ‘मी उमेदवार पाठवू शकतो’?

संबंधित बातम्या

आरारारा… खतरनाक!!! Cylinder Man सागर जाधवला प्रवीण तरडेंकडून चित्रपटात संधीचं आश्वासन

Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.