Burj Khalifa! या विक्रेत्याची कला तर बघा…
असं म्हटलं जातं की, कुठल्याही कामात अनुभव खूप महत्त्वाचा असतो. यातून जगाला तुमच्या क्षमतेची जाणीव तर होतेच, पण तुमची प्रतिभा पाहून अनेक जण तुमच्याकडे आकर्षितही होतात. एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
मुंबई: तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून आला असाल तरी तुम्ही साऊथ इंडियन डिश डोसा खाल्ला असेल. हा पदार्थ दक्षिण भारतातील असला तरी त्याचे नाव येताच अनेकांच्या तोंडाला पाणी येते. त्यामुळेच खाद्यपदार्थ विक्रेते या पदार्थाचे विविध प्रकारे प्रयोग करतात. जे अनेकदा लोकांना खूप आवडतं. एका फेरीवाल्याने बुर्ज खलिफा डोसा बनवला आहे.
असं म्हटलं जातं की, कुठल्याही कामात अनुभव खूप महत्त्वाचा असतो. यातून जगाला तुमच्या क्षमतेची जाणीव तर होतेच, पण तुमची प्रतिभा पाहून अनेक जण तुमच्याकडे आकर्षितही होतात. एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या कलात्मकतेचा असा नमुना सादर केला की, इंटरनेट पब्लिक त्या व्यक्तीची फॅन झाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या पॅनवर दोन मोठे डोसा बनवताना दिसत आहे. यानंतर तो मसाले तयार करतो आणि मग तो रोल करून बुर्ज खलिफासारखा ठेवतो. शेवटी तो डोसाची रचना अशा प्रकारे तयार करतो की ती अगदी बुर्ज खलिफाच्या इमारतीसारखी दिसते.
View this post on Instagram
bhukkadbhaiyaji_ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही बातमी 1.20 हजारांहून अधिक लोकांनी ती पाहिली असून कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलं, ‘भाईमध्ये हे टॅलेंट खरंच अप्रतिम आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘डोसा दिसायला खूप छान दिसतोय.’