Video: एक उडी आणि सरळ अंडरवेअरमध्ये एन्ट्री, पाकिस्तानच्या लोकांनी टायगरला दिलं Underwear Challenge
व्हिडिओमध्ये दोन मुलांनी हातात अंडरवेअर पकडलेली आहेत. त्याचवेळी तिसरा दूर उभा आहे. यानंतर, तो धावत येतो आणि उडी मारतो आणि अंडरवेअरमध्ये सहज शिरतो.
पाकिस्तानसमोर अनेक आव्हानं आहेत, ही गोष्ट साऱ्या जगाला माहित आहे. मात्र सध्या पाकिस्तानातला असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो ट्विटरवर खूप चर्चेत आहे. हे आहे अंडरवेअर चॅलेंज. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. गंमत म्हणजे पाकिस्तानी लोकांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना हे चॅलेंज पूर्ण स्वीकारण्यास सांगितलं आहे. (Viral Video of Pakistani Underwear challenge Funny Video viral)
20 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून लोक हसून वेडे होत आहेत. पाकिस्तानमधील अजमर नावाच्या एका ट्विटर युजरने @khannnazmar या हँडलने हे शेअर केले आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या देशात खूप टॅलेंट आहे.’ आता किती टॅलेंट भरले आहे, तुम्ही या अंडरवेअर चॅलेंज व्हिडिओमध्ये स्वतःच पाहू शकता.
व्हिडीओ पाहा:
Alhumdulillah my country is full of talent pic.twitter.com/A0CupV7eOf
— aزmaر (@khannnazmar) November 27, 2021
व्हिडिओमध्ये दोन मुलांनी हातात अंडरवेअर पकडलेली आहेत. त्याचवेळी तिसरा दूर उभा आहे. यानंतर, तो धावत येतो आणि उडी मारतो आणि अंडरवेअरमध्ये सहज शिरतो. हे आव्हान तो अतिशय सफाईने तो पूर्ण करतो. एवढेच नाही तर हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तो ज्या पद्धतीने सेलिब्रेट करतो, ते पाहण्यासारखे आहे.
27 नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 9 लाखांहून अधिकवेळा पाहिलं गेलं आङे. आतापर्यंत 19 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
हेही पाहा: