नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत सध्या गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि अभिनेत्री नोरा फतेही(Nora-Fatehi)चं 'नाच मेरी रानी' हे गाणं चर्चेत आहे. एका शाळकरी मुलीनं या गाण्यावर अशा डान्स स्टेप्स दाखवल्या की सोशल मीडिया यूझर्स वेडे झालेत.

नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video
'नाच मेरी रानी'वर डान्स करताना शाळकरी मुलगी
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 12:18 PM

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत सध्या गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि अभिनेत्री नोरा फतेही(Nora-Fatehi)चं ‘नाच मेरी रानी’ हे गाणं चर्चेत आहे. काय खास या गाण्यात? प्रत्येकजण ‘नाच मेरी रानी’ (Naach Meri Rani) गाण्यावर थिरकताना दिसतोय. अलीकडेच एका शाळकरी मुलीनं या गाण्यावर अशा डान्स स्टेप्स दाखवल्या की सोशल मीडिया यूझर्स वेडे झालेत. तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. सोशल मीडिया यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडतोय.

अप्रतिम डान्स स्टेप्स व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी झोपडपट्टीत उभी असल्याचं दिसतंय. ती शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये आहे. यानंतर, मुलगी नोरा फतेही आणि गुरू रंधावा यांच्या ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर नाचू लागते. या मुलीनं गाण्यावर अप्रतिम डान्स स्टेप्स केल्या. तिच्या एनर्जीचं सगळ्यांनाच कौतुक वाटतंय. यादरम्यान मुलीचे एक्सप्रेशन्सही पाहण्यासारखे आहेत. एवढ्या लहान वयात मुलीनं नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्स ज्या पद्धतीने कॉपी केल्या आहेत, ते कौतुकास्पद आहे. सोशल मीडिया यूझर्सना तर प्रचंड आवडलाय हा व्हिडिओ. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

गुरू रंधावानं केला शेअर नोरा फतेहीचं कोणतंही गाणं सोशल मीडियावर येताच धमाका उडवून देतं. आता तिचं ‘नाच मेरी रानी’ हे गाणंच घ्या ना. लोक या गाण्यावर रील बनवत आहेत आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. या शाळकरी मुलीचा व्हिडिओ स्वतः गुरू रंधावानं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलाय. मुलीचा हा डान्स व्हिडिओ पाहून नोरा फतेहीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

तुफान चालतोय व्हिडिओ एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे. गुरू रंधावाची ही पोस्ट आतापर्यंत 19 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेलीय. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यावर सातत्यानं कमेंट करत आहेत. यावर एका यूझरनं कमेंट करताना म्हटलंय, की ‘लव्हली.’ त्याचवेळी दुसऱ्या यूझरनं कमेंट करत लिहिलंय, ‘व्वा! क्या बात है.’

चिमुरड्यानं केला इंजिनिअर्सचा घोर अपमान..! पाहा Viral Video

Viral : ट्रेनमध्ये बिनधास्त झोपताय का? रेल्वेच्या डब्यातला हा Video पाहा, हसून हसून पोट दुखेल

Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.