Video: आईस्क्रिम खाताना चिमुरड्याची गोंडस रिएक्शन, व्हिडीओ पाहून तुम्हालाही भारी वाटेल!
सध्या एका लहान मुलाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचाही दिवस आनंदात जाईल.
लहान मुलांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहताना अनेकवेळा आपण हसतो, तर काही व्हिडिओ असेही समोर येतात जे आपल्या हृदयाला स्पर्श करतात. सध्या एका लहान मुलाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचाही दिवस आनंदात जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सना इतका आवडला आहे की त्यांना तो पुन्हा पुन्हा बघायला आवडतो आहे. (Viral Video of Small Child cute Smile after eating ice cream people will love this Funny Video )
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोंडस लहान मूल महिलेच्या कुशीत असून के आईस्क्रीमचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे, मात्र यादरम्यान तो असे कृत्य करतो हे पाहून तुम्हाला खूप भारी वाटेल. म्हणतात ना मुलं देवाघरची फूलं, ही म्हण इथं अगदी सार्थक होताना दिसेल. या व्हिडिओतील मुलाचे भाव खरोखरच अप्रतिम दिसत आहेत. आत्तापर्यंत व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आहेत.
व्हिडीओ पाहा:
— kids Addiction ? (@kidsaddiction) November 1, 2021
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांचे व्यसनमुक्ती पेजवर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहू शकता. हा 27 सेकंदांचा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहली जाईपर्यंत या व्हिडिओला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका युजरने म्हटले की हा व्हिडिओ खरोखरच क्यूट आहे, मी या मुलाच्या प्रेमात पडलो आहे.तर दुसऱ्या युजरने लिहिले की, मुलाच्या गोंडसपणाने माझे मन जिंकले आहे. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले आहे.
हेही पाहा:
Video: आईला लांबसडक केस, मी टकला कसा?, चिमुरड्याची गोंडस रिएक्शन पाहुन तुमचा दिवस आनंदात जाईल!
Viral: सिंहाला हात लावण्यासाठी खिडकी उघडली, आणि त्यानंतर जे झालं त्याने तुमच्या अंगावर काटा येईल!