AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video काळजात “धस्स…” करून जातो, खरंच आयुष्याची किंमत जास्त की पैशाची किंमत जास्त?

काळजात "धस्स..." करणारा हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल आणि आयुष्य किती अवघड आहे याचा विचार कराल. एका हातात बॉटल आणि दुसऱ्या हाताने त्याने रेल्वेच्या दरवाज्यातला खांब पकडला आणि....व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ जशास तसे कॅमेऱ्यात कैद होतात. त्यातील हा एक व्हिडीओ...

Viral Video काळजात धस्स... करून जातो, खरंच आयुष्याची किंमत जास्त की पैशाची किंमत जास्त?
indian railways video viralImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 12, 2023 | 12:57 PM
Share

मुंबई: सोशल मीडिया खूप मोठं आहे, अगदी समुद्रा इतकं मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. यावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. डान्स, गाणे, प्रॅन्क, खाणं असे अनेक अनेक प्रकारचे व्हिडीओ. सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्म्सचा लोकं सुद्धा चांगल्या प्रकारे वापर करून घेतात. व्हिडीओ आवडले की लोक तो व्हिडीओ अक्षरशः डोक्यावर घेतात. बरं सगळे व्हिडीओ एकीकडे आणि रेल्वेशी संबंधित व्हायरल होणारे व्हिडीओ एकीकडे. रेल्वे मध्ये तर लोक व्हिडीओसाठी अक्षरशः धुमाकूळ घालतात. कधी नाचतात, कधी गाणं म्हणतात, कधी त्या रेल्वेवरच लोक स्टंट मारतात. हे स्टंट इतके जीवावर बेतणारे असतात की बघण्याला अंगावर काटा येतो. कधी-कधी काही व्हिडीओ असे देखील व्हायरल होतात ज्यात मुद्दामहून काहीच केलेलं नसतं. आता हाच व्हिडीओ बघा, अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे.

कॅमेऱ्यात कैद

रेल्वेचे आपण अनेक व्हिडीओ बघतो. लोक व्हायरल होण्यासाठी अनेक स्टंट करायला जातात पण काही गोष्टी व्हायरल होण्याच्या हेतूने केलेल्या नसतात. त्या खरंच जशा आहेत तशाच कॅमेऱ्यात कैद केलेल्या असतात. आपण रेल्वेने प्रवास करताना फेरीवाले येतात. कधी कधी कुठल्या स्टेशनला गाडी थांबली नाही तरीही आपल्याला फेरीवाले मात्र नक्कीच दिसतात. ते कसे रेल्वे मध्ये येतात याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. आपण तितका विचारही करत नाही. आता हाच व्हिडीओ बघा,

व्हिडीओच्या खाली प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्ये एक फेरीवाला चालत्या रेल्वेमध्ये चढायचा प्रयत्न करतो. तो जेव्हा चढायला जातो तेव्हा खाली पडतो, तो इतका वाईट पद्धतीने खाली पडतो की बघणाऱ्याच्या काळजात “धस्स…” होतं. हा माणसू पाण्याच्या बॉटल विकायला रेल्वेत चढत असतो. पण रेल्वेमध्ये चढताना त्याचा अपघात होतो. एका हातात पाण्याच्या बॉटल आणि दुसऱ्या हाताने रेल्वेला पकडून वर चढायचा प्रयत्न या सगळ्यात तो माणूस खाली पडतो. तो ज्या हाताने रेल्वेला पकडतो तो हातच सटकतो म्हणून तो खाली पडतो. हा व्हिडीओ खूप धक्कादायक आहे. आयुष्य काय इतकं स्वस्त आहे का? असं लोकं व्हिडीओच्या खाली प्रतिक्रिया देताना म्हणतायत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.