Viral Video | हुशार पोपटाची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पोपट सांगून दिलेले काम करत असल्याचं दिसून येतंय. यावर नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही रंजक आहेत. या व्हिडीओचं कौतुक करताना अनेक लोक दिसतायेत. आपनं अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असं काम हा पोपट व्यवस्थितपणे करतोय.

Viral Video | हुशार पोपटाची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 1:26 PM

मुंबई : पोपटाचे (Parrot) अनेक किस्से आपण ऐकले असतील. अनेकांच्या घरात पाळलेला पोपट असतो. त्या पोपटाला शिकवलेलं असल्यास तो बोलतोही. अनेक ठिकाणी तर पोपटाला तसं शिकवलंही जातं. पोपट शुद्ध बोलत असल्याचेही अनेक उदाहरण आहे. असं म्हटल जातं की पोपट आपण जे बोलतो. ते लक्षात ठेऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याला शिकवल्यास तो नावही अचूक घेतो. त्याला सांगितलं तेव्हा तो ते नाव उच्चारतो. अशातच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल (viral video) झालाय. हा व्हिडीओ हुशार पोपट नावाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पोपट सांगून दिलेले काम करत असल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही रंजक आहेत. या व्हिडीओचं कौतुक करताना अनेक लोक दिसतायेत. आपन अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असं काम हा पोपट व्यवस्थितपणे करतोय.

काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडीयावर व्हायर होत असलेला व्हिडीओमध्ये एक पोपट कोल्ड्रिंक्सच्या बाटलीचं झाकन एक एक करून डस्टबिनमध्ये टाकत आहे. विशेष म्हणजे या पोपटाला डस्टबिन कसं उघडायचं हे देखील माहीत आहे. तो त्याचं काम व्यवस्थित करत आहे. पोपट डस्टबिनचं झाकन उघडण्यासाठी त्याच्या पायाचा उपयोग करत आहे. ते उघडल्यानंतर एक-एक कोल्ड्रिंक्सच्या बाटलीचं झाकन पोपट डस्टबिनमध्ये टाकत आहे. पोपट आपल्या बुद्धिमत्ता अशा पद्धतीनं दाखवत असल्यानं अनेक जणांना या पोपटाचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर अनेक रंजक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

पाहा हुशार पोपटाचा व्हिडीओ

पोपटाच्या व्हिडीओला पसंती

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटरवर हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, छोटा पोपट माणसांपेक्षा जास्त बुद्धिमान असतो…!. हा 17 सेकंदांचा व्हिडीओ आतापर्यंत 16 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 1 हजार 300 पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाईक केलंय.

बुद्धीमान पोपटाचे अनेक किस्से

पोपट हा एक बुद्धीमान पक्षी म्हणून ओळखला जातो. तुम्ही अनेक ठिकाणी बोलणारे पोपट देखील पाहिले असतील. जे पोपट हुबेहूब माणसांचा आवाज काढतात. पोपटासमोर तुम्ही एखादे वाक्य वारंवार जर बोललात तर तो पोपट देखील त्या वाक्याची नक्कल करतो. पूर्वी असाच एका  पोपटाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीमध्ये एक लाल रंगाचा पोपट दिसत होता . जो पोपट हुबेहुब आय फोनच्या रिंगटोनचा ( iPhone) आवाज काढताना दिसत होता. हा पोपट या आवाजाची एवढी हुबेहुब नक्कल करत होता की, समोरच्या व्यक्तीला आयफोनची रिंगटोन वाजल्याचा भास होईल. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावेळी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

इतर बातम्या

आता बसणार गुणवत्तेबाबतच्या तडजोजीला आळा; सोयाच्या प्रत्येक उत्पादनावर ISI मार्क वापरण्याचे आदेश

शिवसेनेमुळे भाजप उमेदवाराचा उत्तर प्रदेशात अवघ्या 771 मतांनी पराभव, शिवसेनेचा पहिला झटका; सेना भाजपला आव्हान ठरतंय?

VIDEO | देवेंद्र फडणवीस 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात; भाजप नेते पडळकरांची बोचरी टीका

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....