Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोनिका, ओह्ह माय डार्लिंग’ नेव्हीच्या सैनिकांनी खरंच हे गाणं रिहर्सलमध्ये वाजवलं? बघा अफलातून Video

26th January Republic Day : भारतीय नौदलाच्या सैनिकांनी पीरेडदरम्यान, मस्करी मस्करीत मजा-मस्तीत हे गाणं वाजवल्याचं म्हटलंय. हा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे.

'मोनिका, ओह्ह माय डार्लिंग' नेव्हीच्या सैनिकांनी खरंच हे गाणं रिहर्सलमध्ये वाजवलं? बघा अफलातून Video
भारतीय नौदलाच्या व्हायरल व्हिडीओतील फोटो
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:53 AM

साल 1971. सिनेमाचं नाव कारवा. आर.डी.बरमन यांचं संगीत. आशा भोसले यांचा आवाज आणि हेलननं आपल्या अदाकारीनं त्या गाण्याला चारचांद लावले होते. गीताचे बोल होते, पिया तू अब तो आजा! (Piya Tu Ab toh Aaja) हे गाणं आता पुन्हा आठवण्याचं कारण ठरलंय, ते म्हणजे भारतीय नौदल. भारतीय नौदलाचा आणि या गाण्याचा एकमेकांशी काय संबंध? असा प्रश्न कुणालाही पडेल. पडायलाही हवा. पण खरंच या गाण्याचा एकमेकांशी संबंध आता जोडला जातोय. भारतीय नौदलानं आपल्या परेडचा रियाज करताना मोनिका, ओह्ह माय डार्लिंग, (Monica, Ohh My Darling) या गाण्याचे स्वर घुमलेत. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी छेडलेले हे वेगळे सूर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या निमित्तानं नवी चर्चाही रंगली आहे. खरंतर सैन्य म्हटलं की फक्त देशभक्तीपर गाणींच आपल्या नजरेसमोर येतात. अशा नौदलाच्या सैनिकांच्या परेडच्या रियाजादरम्यान, हे गाणं वाजवलं का? यावरुनही चर्चांना उधाणा आलंय.

भारतीय नौदलाच्या सैनिकांनी पीरेडदरम्यान, मस्करी मस्करीत मजा-मस्तीत हे गाणं वाजवल्याचं म्हटलंय. हा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. 26 जानेवारीच्या परेड निमित्तही प्रॅक्टीस करताना अचानक बॉलिवूड गाणं वाजल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. अशात भारतीय सैनिकांनी जरा काही हटके गाणं वाजवलं असेल, आणि त्याची बातमी होणार नाही, अशी शक्यताही कमीच आहे. त्यातनंही ते गाणं जर ‘पिया तू अब तो आजा’ असलं, मग तर हमखास ते व्हायरल होणारच!

या गाण्याचा व्हिडीओ आर्कस्केप्स नावाच्या युट्युब अकाऊंटवर 21 जानेवारी 2022 रोजी सगळ्यात आधी शेअर करण्यात आला होता. दिल्लीत राजपथावर रिहर्सल करताना भारतीय नौदलाच्या सैनिकांनी हे गाणं वाजवल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, ट्विटरवर अनेकांनी हे गाणं वाजवणाऱ्या सैनिकांच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. तर काहींना मात्र ही बाब खटकली आहे. एकूणच काय तर भारतीय सैनिक ओह्ह माय डार्लिंगमुळे चर्चेत आले आहेत.

आतापर्यंत लाखो लोक भारतीय नौदलाची या रिहर्सलचा व्हिडीओ पाहून झाली असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. काहींना भारतीय सैनिकांचं हे आर.डी.बर्मन प्रेम खटकलं असलं, तरी अनेकांना हा व्हिडीओ कमालीचा भावला आहे.

इथे पाहा Uncut Video –

इतर बातम्या :

Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!

Video : गोरखा जवानाचा पारंपरिक खुकरी डान्स सोशल मीडियावर Viral

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.