फळे विकणारी आई, व्हिडीओ भावुक करणारा! Viral
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही! हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. हे तुमच्याही आयुष्यात नेहमीच खरं ठरत असेल. कुणाचीही आई असो, आई हे दैवतच! नाही का? हा व्हिडीओ बघा, असे अनेक व्हिडीओ तुम्ही या आधी सुद्धा पाहिले असतील. पण हा व्हिडीओ डोळ्यात पाणी आणतो.
मुंबई: आई सोबत असेल तर जगात काहीही साध्य होऊ शकतं असं म्हणतात. आई आपल्या मुलांना शिकवते, स्वतः काम करून पैसे कमावते, घरातलं काम करते, सगळंच करते. आईने जर ठरवलं तर ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. बरेचदा व्हिडीओ शेअर होत असतात ज्यात आई काय आहे हे दिसून येतं. एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ बघूनच तुम्हाला कळेल. आई ही सर्वांची सारखीच असते. तुमची आमची, एखाद्या गरीबाची किंवा एखाद्या श्रीमंतांची आई ती आईच! ती आपल्या मुलांसाठी कोणत्याही परिस्थितीत चांगलं करायला जाते.
तिच्या मुलांचा अभ्यास घेते
हा व्हिडीओ बघा. या व्हिडीओ मध्ये एक बाई रस्त्यावर फळे विकतीये. फळे विकत आहे म्हणजे कळून येतं की त्यांची परिस्थिती काही खास नाही. फळे विकत असताना मागे तिचे मुलं बसलेले आहेत. ती फळे विकायचं काम करता करता आपल्या मुलांना सुद्धा शिकवत आहे. आई पेक्षा जास्त शिक्षणाचं महत्त्व कुणाला असेल? ती फळे विकते आणि तिच्या मागे बसलेल्या तिच्या मुलांचा अभ्यास सुद्धा घेते. ती घरासाठी कमवत सुद्धा आहे आणि घरातील पुढच्या पिढीला शिकवत सुद्धा आहे.
आज कैप्शन के लिये मेरे पास शब्द ही नहीं हैं..!! 💕#मां #Respectfully 🙏 pic.twitter.com/8A3WEFmAMg
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) August 29, 2023
घर सुद्धा सांभाळते
हा व्हिडीओ एका ऑफिसरने ट्विटरवर पोस्ट केलेला आहे. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलंय आज माझ्याकडे कॅप्शन लिहिण्यासाठी शब्द नाहीत. हा व्हिडीओ बघून अनेकजण भावुक झाले आहेत. परिस्थितीशी दोन हात करताना ही आई थकत नाही. न थकता ती तिच्या मुलांनाही शिकवते आणि घर सुद्धा सांभाळते यापेक्षा चांगला व्हिडीओ अजून कुठला असू शकतो? हे सगळं रस्त्यावर सुरु आहे. आजूबाजूला रहदारी, दुकाने, प्रचंड गोंधळ आणि त्या गोंधळात ती मुले अभ्यास करतायत.