Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बघता-बघता सगळा साबण खाऊन टाकला! म्हणाली,”मला साबण खूप आवडतो!”

माणूस काय खाऊ शकतो? फळे, भाज्या वगैरे वगैरे...पण तुम्ही कधी कुणाला साबण खाताना पाहिलं आहे का? एखादी व्यक्ती गपागप साबण खाते आणि तो व्हिडीओ व्हायरल होतो. अजबच आहे ना? सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यात माणूस पण खूप विचित्र आहे. तरी, माणूस साबण खाऊ शकतो? हा व्हिडीओ बघा तुम्हाला चांगलाच धक्का बसेल.

बघता-बघता सगळा साबण खाऊन टाकला! म्हणाली,मला साबण खूप आवडतो!
eating soap
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 4:18 PM

मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लोक यात नाचताना दिसतात, कधी गात असतात. कधी काय तर कधी काय. सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी कधी तर इतके विचित्र व्हिडीओ असतात की आपण विचारही करू शकत नाही. आता बघा ना, कुणी कधी साबण खाऊ शकतं असा विचार तुम्ही करू शकता का? नाही ना? इतक्या विचित्र गोष्टींचा विचारही करवत नाही. माणूस टरबूज खाईल, संत्रे खाईल, भाज्या खाईल अजून काय-काय खाईल पण साबण? साबण कोण खातं? हा व्हिडीओ बघा तुम्हाला कळेल आम्ही काय म्हणतोय.

“मला साबण खूप आवडतो!”

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी साबण खातीये. व्हिडीओच्या सुरुवातीला ती हँडवॉश आणि साबण दाखवते, त्यानंतर ती हा साबण गपागप खाते. ती अक्षरशः जराही न थांबता हा साबण खाते. व्हिडीओ बघताना तुमच्या अंगावर काटा येईल, तुम्हाला खूप घाण वाटेल. तुम्ही विचार कराल माणूस साबण कसा खाऊ शकतो. व्हिडीओ पोस्ट करताना या मुलीने, ‘मुझे साबुन बहुत पसंद है’ असं कॅप्शन दिलंय. आधी हे कॅप्शन बघून वाटतं की कदाचित ही साबण वापरण्याची गोष्ट करत असेल पण ती तसं न करत लगेचच तो साबण खायला सुरुवात करते.

View this post on Instagram

A post shared by Suchi Dutta (@21b_kolkata)

व्हिडीओ बघताना तुम्हाला धक्का बसेल

आपण ज्या प्रमाणे आवडीने आइसक्रीम खातो, फळे खातो सगळंच खातो त्याप्रमाणे ही मुलगी हा साबण खाताना दिसते. न थांबता, अगदी आवडीने ती हा साबण खाते. व्हिडीओ बघताना तुम्ही बघतच राहाल असा हा व्हिडीओ आहे. जरा वेळ गेल्यावर ही मुलगी व्हिडीओ मध्ये दाखवते की हा साबण नाही केक आहे. होय! आहे ना आणखी एक धक्का? ज्या गोष्टीला तुम्ही-आम्ही साबण समजलं होतं, जी गोष्ट ती मुलगी साबण आहे असं दाखवत खात होती ती गोष्ट साबण नाहीच, तो एक केक आहे! हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. व्हिडीओ बघताना तुम्हाला चांगलाच धक्का बसेल.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.