Video | भर रस्त्यात महिलेचा रिक्षाचालकाशी वाद, राग अनावर झाल्याने थेट चपलेने मारले, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असून यामध्ये एक महिला रिक्षा चालकाशी वाद घालत आहे. तसेच वाद चिघळल्यामुळे महिलेने चालकाला कानशीलात लावत नंतर चपलेने मारले आहे. या व्हिडीओमध्ये महिला रिक्षा चालकाला मारत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलेसोबत इतर दोन माणसेसुद्धा आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंमध्ये लोकांचे भांडण आणि मारहाण दाखवलेली असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने रिक्षा चालकाला थेट चपलेने मारले आहे. चालकाला मारतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (women of uttar pradesh beating auto driver with chappal video went viral on social media)
व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असून यामध्ये एक महिला रिक्षा चालकाशी वाद घालत आहे. तसेच वाद चिघळल्यामुळे महिलेने चालकाला कानशिलात लावत नंतर चपलेने मारले आहे. या व्हिडीओमध्ये महिला रिक्षा चालकाला मारत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलेसोबत इतर दोन माणसेसुद्धा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाच्या भाड्यावरुन चालक आणि व्हिडीओतील महिला यांच्यात वाद झाला आहे.
नेमका प्रकार काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालकाला मारहाण केल्याची ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. मार खात असलेल्या रिक्षा चालकाच्या रिक्षामधून एक महिला आणि दोन माणसांनी प्रवास केला. त्यानंतर चालकाने पूर्ण भाडे मागितल्यावर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. नंतर वाद विकोपाला गेल्यामुळे रिक्षा चालकाने ट्रॅफिक पोलिसांची मदत घेऊन ठरल्याप्रमाणे भाडे देण्याची मागणी केली. मात्र, पोलीस समोर असूनदेखील व्हिडीओतील महिला तसेच इतर दोन माणसांनी भाडे देणे नाकारले.
महिलेने ड्रायव्हरला थेट चपलेने मारले
यानंतर दोन माणसांनी रिक्षा चालकाशी वाद घातला. तसेच राग अनावर झाल्यानंतर महिलेने रिक्षा ड्रायव्हरवर हल्ला करुन त्याला मारले. हद्द म्हणजे महिलेने ड्रायव्हरला थेट चपलेनेसुद्धा मारले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
लखनऊ फिर हुई ड्राइवर की पिटाई एक मामला अभी थमा नहीं और दूसरा मामला आ गया। दरअसल लखनऊ में फिर टेंपों चालक की पिटाई करने की तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल हो रहा है सिर्फ पैसे मांगने को लेकर पिटाई कर दी।। ????#JusticForAutoPilot#LucknowAutoDriver#lucknowviralvideo #Lucknow pic.twitter.com/5XLYtqzqGQ
— Ashok Kumar (@AshokKumar85215) August 22, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी रिक्षा चालकाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच महिला आणि इतर दोन माणसांवर योग्य ती कारवाई केली जावी असे नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, या प्रकरणात अजूनतरी पोलिसांत कोणीही तक्रार नोंदवलेली नाही.
इतर बातम्या :
Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स
फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?
Video | जंगलातून आला, कुंपनात फसला, वाघाच्या डरकाळीने नागरिकांत घबराट
(women of uttar pradesh beating auto driver with chappal video went viral on social media)