Video | ना योगा ना डायट, एका झटक्यात वजन केलं कमी, महिलेची करामत पाहून नेटकरी चक्रावले

वजन कमी करण्यासाठी एका महिलेने अजब डोकं लावलं आहे. तिने केलेली करामत पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय .

Video | ना योगा ना डायट, एका झटक्यात वजन केलं कमी, महिलेची करामत पाहून नेटकरी चक्रावले
weught-loss viral video
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 6:17 PM

मुंबई : आपल्या देशात कधी कोण कसं डोकं लावेल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे लोक आपल्या देशात आहेत. सध्या तर वजन कमी करण्यासाठी एका महिलेने अजब डोकं लावलंय. तिने केलेली करामत पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय . (women used special trick for reducing weight funny video went viral on social media)

वजन कमी करण्यासाठी महिलेने वेगळंच डोकं लावलं

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक जमेल तो प्रयत्न करतात. कोणी योगा तर कोणी झुम्बा डान्स करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर कोणी स्पेशल डायट प्लॉन तयार करुन वजन वाढण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करतो. सध्या व्हायरल होत असलेल्या महिलेने मात्र वजन कमी करण्यासाठी वेगळंच डोकं लावलं आहे. वाढलेलं वजन एका झटक्यात कमी करण्यासाठी तिने जबरदस्त जुगाड लावलं आहे.

महिलेने नेमकं काय केलं आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने एक मजेदार काम केले आहे. व्यायाम करत असताना या महिलेने सुरुवातीला आपले वजन मोजले आहे. वजन वाढल्याचे समजताच तिने डोक्याला हात लावलाय. वजन वाढल्यामुळे आता काय करावं ? असा प्रश्न तिला पडला आहे. मात्र पुढल्याच क्षणी या महिलेने डोकं वापरलं आहे. व्हिडीओतील महिला खाली झोपली आहे. खाली झोपून या महिलेने पाय वर केले आहेत. तसेच वर केलेल्या पायांवर वजनकाटा ठेवला आहे. परिणामी या महिलेचे वजन आपोआपच कमी झाले आहे. वजनकाट्याने तिचे वजन कमी दाखवले आहे. कसलाही व्यायम न करता तिने स्वत:च्या समाधानासाठी जमिनीवर झोपून स्वत:चे वजन केल्यामुळे सगळ्यांनीच डोक्याला हात लावला आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला hepgul5 इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या : 

Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | कशाचाही विचार न करता तरुणीने सापाला पकडलं, पुढं काय झालं एकदा पहाच

VIDEO : विधींच्या दरम्यान नवरी गोंधळली, नंतर असं काही झालं की हे पाहून नातेवाईक देखील हैराण झाले!

(women used special trick for reducing weight funny video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.