Video : ओह..! सोशल मीडियावर Viral होत असलेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळून जाल
'सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत' आपण अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ पाहतो, ज्यानंतर आपण खूप गोंधळून जातो. खरं तर, या फोटो आणि व्हिडिओंमध्ये आपण जे पाहतो ते काहीतरी वेगळंच आहे.
‘सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत’ आपण अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ पाहतो, ज्यानंतर आपण खूप गोंधळून जातो. खरं तर, या फोटो आणि व्हिडिओंमध्ये आपण जे पाहतो ते काहीतरी वेगळंच आहे. जर आपण फोटोंबद्दल बोललो तर त्यासाठी एक तीक्ष्ण मन आणि तीक्ष्ण नजर आवश्यक आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हालाही लक्षात येणार नाही की तुम्ही कुत्रा पाहिला की मांजर. हा व्हिडिओ असल्यानं काही सेकंदांनी तुमचा गोंधळही दूर होईल.
नीट पाहा व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीला तुम्हाला एक परिसर दिसेल. तिथं अनेक घरं आहेत. यानंतर कॅमेऱ्याचा अँगल झूम केल्यावर तुम्हाला घराच्या छतावर एखाद्या प्राण्यासारखं काहीतरी दिसेल. कॅमेऱ्याचा झूम आणखी वाढवला की हळूहळू चित्र साफ व्हायला लागतं. आता तुम्हाला छतावर कुत्र्याचं डोकं दिसेल. पण छे. हा तुमचा भ्रम आहे. तो कुत्रा नाही, मांजर आहे. मात्र, हा प्राणीही कुत्र्यासारखा दिसतो. पण पुढच्याच क्षणी झूम आणखी वाढवताच कुत्रा मांजर बनतो. याचा अर्थ, हा कुत्रा नाही, तर ती मांजर आहे जी छतावर बसलेली आहे आणि खाली काहीतरी पाहत आहे. चला तर मग पाहू या, हा मजेदार व्हिडिओ.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर viralhogनं शेअर केला आहे. युजरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘कुत्रा किंवा मांजर… तुम्ही काय पाहिलं?’ एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो 56 हजारांहून अधिक जणांनी पाहिलाय. ही संख्या सातत्यानं वाढतेय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या कमेंट्स द्यायला सुरुवात केलीय.
यूझर्सना आवडला व्हिडिओ एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की या व्हिडिओमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे, मलाही आधी वाटलं की कुत्रा असेल. त्याचवेळी दुसऱ्या यूझरनं स्मायलीसह लिहिलंय, की हा कुत्रा आणि मांजर दोन्ही आहे. याशिवाय, सोशल मीडिया यूझर्सना हा व्हिडिओ इतका आवडला आहे, की ते त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना कमेंट सेक्शनमध्ये टॅग करून पाहण्यासाठी आमंत्रित करत आहेत.