नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…
आता नॅनो लवकरच आपले रुपडे पालटण्याची शक्यता आहे. नॅनो कारला आता इलेक्ट्रिक वाहानाच्या रुपात सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासोबत इलेक्ट्रिक नॅनोचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजग रतन टाटा (Ratan Tata) यांनी अतिशय कमी खर्चात नॅनो (Nano) कारची निर्मिती केली होती. प्रत्येक घरात कार असावी हे त्यामागचे स्वप्न होते. या कारची किंमत देखील अतिशय कमी म्हणजे एक लाख रुपये एवढीच ठेवण्यात आली होती. मात्र ग्राहकांचा (customers) या गाडीला अपेक्षीत असा प्रतिसाद न मिळाल्याने नॅनो प्रकल्पाला मोठा फटका बसला. मात्र आता नॅनो लवकरच आपले रुपडे पालटण्याची शक्यता आहे. नॅनो कारला आता इलेक्ट्रिक वाहानाच्या रुपात सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासोबत ElectraEV अर्थात इलेक्ट्रिक नॅनोचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोनसोबत टाटा मोटर्सने एक कॅप्शन देखील दिले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, आम्ही नॅनोपासून एक इलेक्ट्रिक कार बनवली आहे. ही इलेक्ट्रिक कार आम्ही जेव्हा रतन टाटा यांना सुपुर्द केली तेव्हा त्यांना ती कार केवळ आवडलीच नाही तर त्यांनी या कारमध्ये प्रवासाचा आनंद देखील घेतल्याची माहिती टाटा मोटर्सच्या वतीने देण्यात आली आहे.
लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार?
असा अंदाज लावला जात आहे की, टाटा मोटर्स लवकरच नॅनोचा इलेक्ट्रिक अवतार मार्केटमध्ये आणू शकते. मात्र अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र टाटाची नॅनो जर इलेक्ट्रीक रुपात बाजारात आल्यास सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक कार उपलब्ध होईल. इलेक्ट्रा ईव्ही या कंपनीने ही कार डिजाईन केली आहे. इलेक्ट्रीक कार तयार करून ती रतन टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली. टाटा यांना देखील ही कारण आवडली असून, त्यांनी या छोट्या इलेक्ट्रीक कारमधून प्रवासाचा आनंद देखील घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दहा सेंकदात 60 किलोमीटर प्रती तासाचा वेग
ही कार पिकपच्या बाबतीत देखील अव्वल असून, ती अवघ्या दहा सेंकदात 60 किलोमीटर प्रती तासाचा वेग पकडते. असा दावा देखील कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान ही कार बाजारात आल्यास तीची किंमत देखील किफायतशीर असणार आहे. नॅनोचा हा नवा लूक ग्राहकांच्या पसंतीस पडल्यास गाडीची मोठ्या संख्येने विक्री देखील होऊ शकते. तसेच त्यामुळे इंधनाची बचत होऊन, प्रदूषणाला आळा बसेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा
रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार – सर्व्हे
Share बाजार सारखा आपटतोय! गुंतवणूक करण्याची हीच खरी सुवर्ण संधी? काय सांगतात तज्ज्ञ?