AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good news: विमान प्रवास स्वस्त होणार, केंद्र सरकार तिकिटावरील कॅप 31 ऑगस्टपासून हटवणार, आता एयरलाईन्स ठरवणार किंमती

विमान प्रवासदरावरील मर्यादा हटवल्यानंतर विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यात इंडिगो, स्पाईसजेट, एयर इंडिया, विस्तारा आणि नवीन कंपनी अकासा यांचा समावेश असेल. गेल्या काही काळापासून विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या पूर्वी असलेली प्रवासी संख्या सध्या विमान प्रवास करताना दिसते आहे.

Good news: विमान प्रवास स्वस्त होणार, केंद्र सरकार तिकिटावरील कॅप 31 ऑगस्टपासून हटवणार, आता एयरलाईन्स ठरवणार किंमती
विमान प्रवास झाला स्वस्तImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली – कोणत्याही निर्बंधाशिवाय आता विमान कंपन्या तिकिटांचे दर ठरवू शकणार आहेत. केंद्र सरकार कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या हवाई प्रवासाच्या दरांविषयीची मर्यादा पूर्णपणे हटविणार आहे. हवाई तिकिटावरील कमाल आणि किमान पातळीवरील मर्यादा हटविण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपासून हा निर्णय लागू होईल. दरावरील नियंत्रण हे 15 दिवसांच्या मर्यादेवर सध्या लागू आहे. याचा अर्थ असा की विमान कंपन्या बुकिंगच्या तारखेच्या 15 दिवसांच्या अवधीनंतर तिकिटे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

काय आहे प्राईस कॅप, जाणून घ्या

15 दिवसांची ही मर्यादा काय आहे हे जाणून घेऊयात. जर एखाद्या व्यक्तीला 15 ऑगस्ट म्हणजे आजपासून 5 दिवसांनी मुंबईहून अहमदाबादला जायचे असेल तर अकासा विमान कंपनीचे तिकिट 4200 च्या घरात असेल. तिकिटाचे हे साधारणपणे पुढील 15 दिवसांत कुठल्याही दिवशीचे तिकिट बुक केले तरी सारखेच असतील. मात्र तुम्ही 25 ऑगस्टचे तिकिट बुक केले तर हे तिकिट तुम्हाला 2100 रुपयांपर्यंत मिळू शकेल. याचा अर्थ असा की यापूर्वी विमान कंपन्या ग्राहकांना स्वस्तात तिकिटे देऊ इच्छित होत्या, मात्र सरकारने घातलेल्या मर्यादेमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यासाठी त्यांना 15 दिवसांच्या कालावधीची मर्यादा अडचणीची ठरत होती.

तिकिटे स्वस्त होण्याची शक्यता

विमान प्रवासदरावरील मर्यादा हटवल्यानंतर विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यात इंडिगो, स्पाईसजेट, एयर इंडिया, विस्तारा आणि नवीन कंपनी अकासा यांचा समावेश असेल. गेल्या काही काळापासून विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या पूर्वी असलेली प्रवासी संख्या सध्या विमान प्रवास करताना दिसते आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलातही वाढ झालेली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय सकारात्मक ठरेल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रवाशांची संख्या आणखी वाढल्यास प्रवाशांच्या तिकिट दरात कपात होण्याची शक्यता आहे.

इंधनाच्या मागणीच्या अभ्यासानंतर निर्णय

हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, एयर टर्बाईन इंधनाच्या दैनंदिन मागण्यांच्या आणि किमतींची सावधानतेनी तपासणी केल्यानंतरच हा प्रवासी तिकिट दरावरील मर्यादा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर, देशांतर्गत विमान प्रवासदरावरील किमतीची मर्यादा हटवण्याची मागणी विमान कंपन्या करीत होत्या. या मर्यादेमुळे विमान प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

मे 2020 मध्ये लावण्यात आली होती तिकिट दरांवर किमतीची मर्यादा

कोरोनाच्या काळात दोन महन्यांच्या लॉकडाऊननंतर 25 मे 2020 रोजी विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली होती. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानांच्या प्रवासांच्या तासावर आधारित विमान तिकिटांच्या दरावर कमाल आणि किमान मर्यादा लावली होती. प्रवासावरील निर्बंधामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विमान कंपन्यांना मदत करण्यासाठी किमान प्रवासी दराच्या किमती ठरवून देण्यात आल्या होत्या. प्रवाशांची मागणी जास्त असेल तर तिकिटे जास्तही वाढू नयेत, यासाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.