Bank Holiday Alert: एटीएममधून आजच पैसे काढा, सलग चार दिवस बँका राहणार बंद
Bank Holiday | गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वच राज्यांमध्ये बँका बंद नसतील. संबंधित प्रदेशानुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम लागू असतील. रिझर्व्ह बँकेकडून स्थानिक सणांनुसार प्रत्येक राज्यात सार्वजनिक सुट्ट्या निश्चित केल्या जातात.
मुंबई: तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम किंवा बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल तर त्यासाठी काही दिवस ताटकळत राहावे लागणार आहे. कारण आजपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. आता बँका थेट 1 सप्टेंबरला उघडतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या सणांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. यापैकी आज चौथा शनिवारी आणि उद्या रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्याने 30 आणि 31 तारखेला देशाच्या विविध भागांत बँका बंद राहतील.
गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वच राज्यांमध्ये बँका बंद नसतील. संबंधित प्रदेशानुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम लागू असतील. रिझर्व्ह बँकेकडून स्थानिक सणांनुसार प्रत्येक राज्यात सार्वजनिक सुट्ट्या निश्चित केल्या जातात. भारतातील अनेक राज्यांमध्ये कृष्णजन्म किंवा गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे 30 तारखेला अहमदाबाद, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद असतील. तर इतर राज्यांमध्ये 31 ऑगस्टला बँक हॉलिडे असेल.
ATM मशीनमध्ये पैशांचा खडखडाट जाणवण्याची शक्यता
सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे बँकांच्या ATM मशीनमध्ये पैशांचा खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना निर्बंधांमुळे लोक बँकेत जाणेही टाळत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनेकजण डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत असल्याने बँका बंद असूनही तितकीशी गैरसोय होणार नाही.
संबंधित बातम्या:
PHOTO: ATM मशीनमधून फाटलेली नोट मिळाली, कशी बदलून घ्याल?
कन्याकुमारी, रामेश्वरमसह आणखी 6 शहरांत फिरण्याची संधी, जाणून घ्या IRCTC च्या टूर पॅकेजबाबत
गॅस एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतेय, कुठे तक्रार कराल?