Currency Notes : 1000 रुपयांच्या नोटेविषयी मोठी बातमी! मोदी सरकार करु शकते घोषणा

Currency Notes : नोटबंदीनंतर देशात अनेकदा प्रत्येक नोटांविषयी काही ना काही माहिती समोर आली आहे. काही वेळा ही माहिती अफवा असल्याचेही समोर आले आहे. आता एक हजार रुपयांच्या नोटेविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Currency Notes : 1000 रुपयांच्या नोटेविषयी मोठी बातमी! मोदी सरकार करु शकते घोषणा
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:17 PM

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर (Notebandi) देशात अनेकदा प्रत्येक नोटांविषयी काही ना काही माहिती समोर आली आहे. काही वेळा ही माहिती अफवा असल्याचेही समोर आले आहे. आता एक हजार रुपयांच्या (1000 Notes) नोटेविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी पण 1000 रुपयांच्या जुन्या नोटांविषयी अनेक वृत्त आले होते. पण यावेळी सूत्रांनी माहिती दिली आहे. ही मोठी अपडेट आहे. नोटबंदीच्या काळात एक हजार, 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी, काळे धन परत आणण्यासाठी नोटबंदी केल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. आता 1000 रुपयाच्या नोटेविषयी मोदी सरकार (Modi Government) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पुन्हा सुरु होऊ शकते नोट

केंद्र सरकारने भ्रष्टाचार, टेरर फंडिंग आणि इतर अनेक कारणांसाठी नोटबंदीची योजना आखली होती. हा उद्देश सफल झाल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. आता केंद्र सरकार 1000 रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणण्याची तयारी सुरु केल्याचा दावा झी न्यूजने सूत्रांच्या आधारे दिला आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने नोटबंदीनंतर 1000 रुपयांच्या नोटांऐवजी 2000 रुपयांची नोट जारी केली होती.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्र्यांचा दावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएममधून दोन हजार रुपयांची नोट गायब झाल्याबाबत दावा दाखल केला आहे. सोमवारी त्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिले. केंद्र सरकारने बँकांना याविषयीचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा भरण्याबाबतचा निर्णय बँकांचा आहे. या नोटांचा उपयोग, तांत्रिक कारणं, ग्राहकांच्या गरजा आणि वातावरणाचा परिणाम यामुळे हा निर्णय घेण्यात येतो. केंद्र सरकारने याविषयी बँकांना कोणतेही निर्देश दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.

आरबीआयचा अहवाल काय सांगतो

RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2022 रोजीच्या आकडेवारीवरुन, 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा 1.6% आहे. त्यांचे मूल्य 4,28,394 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून का गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

तर हा आहे मामला

दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.

2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.