Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम चिल्ड्रन केअर्सला मुदतवाढ; 10 लाखांचा विमा ते नवोदय प्रवेश, जाणून घ्या

मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल. त्यासाठीचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिलं जाईल.

पीएम चिल्ड्रन केअर्सला मुदतवाढ; 10 लाखांचा विमा ते नवोदय प्रवेश, जाणून घ्या
पीएम चिल्ड्रन केअर्सला मुदतवाढ
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:44 PM

नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयानं पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन स्कीमला (PM Cares Scheme) 28 फेब्रवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व राज्ये, केंद्र (Government of India) शासित प्रदेशांचे सचिव, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे अधिकारी यांना पत्र पाठविण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुधारित नियमामुळे सर्व पात्र बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन स्‍कीमचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे अनाथ बालकांना केंद्रीय विद्यालय (Government School) प्रवेश मिळू शकतो. तसेच खासगी शाळांत प्रवेश (School Admission) घेतल्यास सरकारद्वारे शुल्क अदा केले जाईल.

..हरवले आभाळ जयांचे

कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली होती. कोरोना काळात आई किंवा वडिलांना किंवा या दोघांनाही गमावलं असेल अशा मुलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. अशा मुलांना वयाच्या 18 वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

आर्थिक सहाय्यता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा त्यापैकी एकाला गमावलं आहे. त्यामुळे अनेक मुलं अनाथ झाले आहेत. अशा मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही

त्याशिवाय या मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल. त्यासाठीचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिलं जाईल. या अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आयुषमान भारत योजने अंतर्गत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे. त्यासाठीचं प्रीमियम पीएम केअरमधूनच भरलं जाणार आहे.

इतर बातम्या

MahaInfra Conclave: राज्यात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; कोणते नवे प्रकल्प येणार? उद्योग मंत्री सुभाष देसाईंची सविस्तर माहिती

गुंतवणुकीवर चांगला परतावा हवाय? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; दहा वर्षात पैसे दुप्पट

कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.