AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारातून सफरचंद, संत्रा घेताय? त्या फळांवर असलेल्या स्टीकरचा अर्थ काय? 100 पैकी 99 जणांना माहीत नाही हा प्रकार

striker meaning of fruit: मुंबई, पुणे असो की अन्य लहान गावे, सर्वच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सफरचंद, संत्रा यांच्यावर असे स्टीकर लावलेले असतात. या स्टीकरचा एक्‍सपोर्ट-इम्‍पोर्टशी काहीच संबंध नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे.

बाजारातून सफरचंद, संत्रा घेताय? त्या फळांवर असलेल्या स्टीकरचा अर्थ काय? 100 पैकी 99 जणांना माहीत नाही हा प्रकार
striker meaning of fruit
| Updated on: Aug 08, 2024 | 11:02 AM
Share

ग्राहक बाजारातून किंवा मॉलमधून नियमित फळे घेत असतात. त्या फळांवर विशिष्ट प्रकारचे स्टीकर लावलेले असते. सफरचंद, संत्रा यासारख्या फळांवर लावलेल्या स्टीकरचा अर्थ काय असतो? हे 100 पैकी 99 जणांना माहीत नाही. त्यामुळे प्रीमियम क्‍वालिटी किंवा इम्‍पोर्ट क्वालिटीचे फळ देत असल्याचे सांगितले जाते. परिणामी फळ विक्रेते ग्राहकांना सहज फसवू शकतात. मुंबई, पुणे असो की अन्य लहान गावे, सर्वच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सफरचंद, संत्रा यांच्यावर असे स्टीकर लावलेले असतात. या स्टीकरचा एक्‍सपोर्ट-इम्‍पोर्टशी काहीच संबंध नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे. यामुळे हा विषय माहीत असणे गरजेचे आहे. चला तर समजून घेऊ या काय आहे हा विषय…

4 अंकी स्टिकरचा अर्थ काय?

बाजारातून घेणाऱ्या सफरचंद किंवा संत्र्यावर 4 अंकी स्टिकर दिसले तर सावध व्हा. ते खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या. या स्टिकर्सवर लिहिलेले क्रमांक 4 अंकांनी सुरू होतात, जसे की 4026 किंवा 4987. म्हणजेच स्टिकरवर चार अंक असतील आणि त्यांची सुरुवात 4 ने होत असेल, तर अशी फळे कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून तयार केलीली आहेत. हे आकडे फळांची गुणवत्ता दर्शवतात. तुम्हाला ही फळे थोडी स्वस्तात मिळू शकतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारे आहे.

5 अंकांमध्ये नंबर असेल तर?

फळांच्या स्टिकर्सवर 5 अंकी नंबर लिहिलेले असेल तर त्याचाही विशिष्ट अर्थ आहे. या संख्या 8 ने सुरू होतात. जर 84131 किंवा 86532 इत्यादी. फळांवर असे अंक लिहिले असतील तर याचा अर्थ फळे जेनेटिकली मोडिफाइड आहेत. म्हणजेच ही फळे नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत विकसित केली आहेत. रसायने आणि कीटकनाशके असलेल्या फळांपेक्षा त्यांची किंमत जास्त आहे. ही फळे खाणे आरोग्यासाठी काही फायदे देणारी आहेत. परंतु त्याचे काही तोटेही आहेत.

मग सर्वोत्तम काय आहे?

उत्तम दर्जाच्या फळांवर कोणत्या प्रकारचे स्टिकर्स लावले जातात, ते पाहू या. उत्तम दर्जाच्या फळांवर स्टिकर्सवरील संख्या 5 अंकीच आहे. परंतु त्याची सुरुवात 9 पासून सुरू होते. जसे 93435 वगैरे काहीही असू शकते. याचा अर्थ ही फळे रासायनिक आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने तयार केली गेली आहेत. साहजिकच त्यांची किंमत इतरांपेक्षा जास्त असते. पण आरोग्याचा विचार करता,स अशी फळे उत्तम दर्जाची असतात.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.