जाणून घ्या इलेक्ट्रिक कार आणि स्कुटर्स चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो?

Electric Vehicles | मात्र, इलेक्ट्रिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो? चार्जिंगसाठी किती खर्च येणार, अशा सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.

जाणून घ्या इलेक्ट्रिक कार आणि स्कुटर्स चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो?
इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो? चार्जिंगसाठी किती खर्च येणार, अशा सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 7:25 AM

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, अशी चर्चा हल्ली सर्रास कानावर पडते. इलेक्ट्रिक वाहने ही कमी प्रदूषण करणारी असल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे भारतात आगामी दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रिक कारचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

मात्र, इलेक्ट्रिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो? चार्जिंगसाठी किती खर्च येणार, अशा सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या वीजेचा दर?

मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी एका युनिटपाठी साधारण 15 रुपयांचा खर्च येतो. तर दिल्लीत वीज स्वस्त असल्याने प्रत्येक युनिटसाठी 4.5 ते 5 रुपयांचा खर्च येईल. याचा अर्थ दिल्लीत इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना अवघ्या 120 ते 150 रुपयांत संपूर्ण गाडी चार्ज करता येईल.

एखादी कार संपूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण 20 ते 30 युनिटस लागतात. याचा अर्थ प्रत्येकवेळी इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी तुम्हाला 200 ते 400 रुपयांचा खर्च येईल. तर इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज करण्यासाठी 3 युनिट वीज लागते. त्यामुळे तुमची स्कुटर संपूर्णपणे चार्ज करण्यासाठी एकावेळेला साधारण 50 रुपयांचा खर्च येईल.

चार्जिंगसाठी किती वेळ लागतो?

तुम्ही कार्यालायतून घरी आल्यानंतर कार चार्जिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. 15 एमपीच्या एसी चार्जरने तुम्ही गाडी चार्ज करायला गेलात तर त्यासाठी नऊ तास लागतील. तर फास्ट डीसी चार्जरचा वापर केल्यास एका तासात 80 टक्के गाडी चार्ज होते. शेवटची 20 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो.

इलेक्ट्रिक वाहने कितपत व्यवहार्य?

तुम्हाला इलेक्ट्रिक कार घेण्याची कितीही इच्छा असली तरी त्याची किंमत हा कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीच्या काळात तरी इलेक्ट्रिक वाहने ही अन्य वाहनांपेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी महाग असतील. मात्र, ऑपरेटिंग कॉस्ट बघता इलेक्ट्रिक वाहनेही हा चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक कारने एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तुम्हाला 1.2 ते 1.4 रुपये इतका खर्च येतो. तर पेट्रोलच्या गाडीसाठी प्रतिकिलोमीटर खर्च नऊ रुपये इतका आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक कारने महिन्यात 800 किलोमीटर प्रवास केला तरी 640 रुपये खर्च येईल. याऊलट पेट्रोल-डिझेलच्या वाहनाचा महिन्याचा खर्च 7200 रुपये इतका आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून खरेदीवर अनुदान दिले जाते. कारच्या खरेदीवर दीड ते दोन लाखांचे अनुदान मिळते. याचा अर्थ इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाख रुपये असेल तर तुम्हाला ती आठ लाखांपर्यंत मिळेल. याशिवाय, तुम्हाला कर्जाच्या रक्कमेतही सूट मिळू शकते.

संबंधित बातम्या:

भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भेत उभारले

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करणं सोपं होणार, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी Tata ची ‘या’ कंपनीसोबत भागीदारी

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.