AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे कर्मचारी होळीत करणार सप्तरंगांची उधळण; ‘ही’ पेन्शन योजना होणार लागू

पीटीआयच्या वृत्तानुसार EPFO बाबत सर्व निर्णय घेणारी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) या संस्थेची 11 आणि 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे बैठक होणार आहे. या बैठकी, 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज दराबाबत (Interest Rate) निर्णय घेतला जाणार आहे.

15 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे कर्मचारी होळीत करणार सप्तरंगांची उधळण; 'ही' पेन्शन योजना होणार लागू
ईपीएफओImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 11:35 PM
Share

मुंबईः वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी होळी सणाच्या आधी एक आनंदाची गोष्ट समजणार आहे, त्यामुळे येणाऱ्या होळीत 15 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे जे कर्मचारी आहेत, ते सप्तरंगी रंगांची उधळण करणार आहेत. कारण जे कर्मचारी 15 हजारपेक्षा जास्त पगार घेत आहेत असे कर्मचारी (Employee) खूप दिवसांपासून जादा पेन्शन योजनेची मागणी करत आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रातील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी EPFO (Employees’ Provident Fund Organization) ही संस्था सेवानिवृत्ती निधीशी संबंधित कार्यरत आहे. आणि हिच संस्था या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा विचार करत आहे, ज्यांचे मासिक मूळ वेतन रु. 15,000 पेक्षा जास्त आहे ते कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) साठी पात्र असणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

सध्या जे संघटित क्षेत्रातील कर्मचारी आहेत ते त्या सर्वांचा अनिवार्यपणे EPS-95 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार (मूलभूत वेतन+महागाई भत्ता (DA)) हा नोकरीवर रुजू होताना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

नवीन पेन्शन आणण्याचा प्रस्ताव

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार Employees’ Provident Fund Organization (EPFO) ईपीएफओच्या सदस्यांच्या पगारातील हिस्स्यावर अधिक पेन्शनची मागणी करत आहे. या परिस्थितीत 15 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ पगार असलेल्यांसाठी नवीन पेन्शन योजना किंवा नवीन पेन्शन आणण्याचा प्रस्तावही पुढील महिन्यात होणाऱ्या EPFO ​च्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्याज दर निश्चित करण्याचा प्रस्ताव

पीटीआयच्या वृत्तानुसार EPFO बाबत सर्व निर्णय घेणारी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) या संस्थेची 11 आणि 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत, 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज दराबाबत (Interest Rate) निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी या बैठकीबाबत माहिती दिली होती की, या बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याज दर निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. हा निर्णय ते यासाठी देऊ शकतात कारण ते सीबीटी या संस्थेचे ते प्रमुखही आहेत. याआधीच्या झालेल्या बैठकीत सीबीटी या संस्थेने 2021 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवीवर 8.5 टक्के व्याज निश्चित केले होते. त्यामुळे होळी सणाच्या आधी होणाऱ्या बैठकीत कामगारांविषयी काय निर्णय घेण्यात येऊल त्याबाबत कामगारवर्गही उत्सुक आहे.

संंबंधित बातम्या

Salary Account | सारखी नोकरी बदलता? जुनं सॅलरी अकाऊंट बंद करायला विसरु नका, नाहीतर…

कार खरेदीसाठी बँका किती टक्के व्याजदराने कर्ज देतायत? लोन व प्रक्रियेबद्दल ‘या’ गोष्टी अवश्‍य जाणून घ्या

नोकरी बदलली तरी जुने सॅलरी अकाउंट सुरुच, ही बातमी तुमच्यासाठी, अन्यथा बसेल भुर्दंड

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.