कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव
देशातील प्रमुख ऑईल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे (Petrol Diesel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत.
मुंबई : देशातील प्रमुख ऑईल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे (Petrol Diesel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. आज सलग 115 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढल्या तरी देखील आणि कमी झाल्या तरी देखील भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. गेल्या चार नोव्हेंबर रोजी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. रशिया आणि युक्रेनेच युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले होते, मात्र आता त्यामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.
प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.
सलग 115 दिवसांपासून इंधनाच्या किमती स्थिर
शनिवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 103 डॉलरवरून 97 डॉलरवर आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे इंधनाच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल, डिझेलवरी कर कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर दरामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. कच्च्या तेलाच्या किमती कमी जास्त होताना दिसत आहेत. मात्र तरी देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशात सलग 113 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
संबंधित बातम्या
Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता
रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच