पीएफ अकाऊंटचा UAN नंबर विसरलात का, जाणून घ्या पुन्हा कसा मिळवाल

PF UAN No | नोकरी बदलताना किंवा पीएफची रक्कम काढताना यूएएन क्रमांक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, काहीवेळा कागदपत्रे आणि इतर माहिती गहाळ होण्याचा धोका असतो. अशावेळी तुमचा UAN नंबर गहाळ झाल्यास तुम्ही तो ऑनलाईन परत मिळवू शकता.

पीएफ अकाऊंटचा UAN नंबर विसरलात का, जाणून घ्या पुन्हा कसा मिळवाल
पीएफ अकाऊंट
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:33 AM

मुंबई: कोणत्याही नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतांश नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. त्यामुळे नोकरदार पीएफ खात्याबाबत अत्यंत दक्ष असतात. तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक दिला जातो. हा क्रमांक वापरुन तुम्ही वेळोवेळी पीएफ खात्यामधील रक्कम तपासू शकता. नोकरी बदलताना किंवा पीएफची रक्कम काढताना यूएएन क्रमांक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, काहीवेळा कागदपत्रे आणि इतर माहिती गहाळ होण्याचा धोका असतो. अशावेळी तुमचा UAN नंबर गहाळ झाल्यास तुम्ही तो ऑनलाईन परत मिळवू शकता.

UAN नंबर परत कसा मिळवाल?

* सर्वप्रथम ईपीएफओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in. या पोर्टलवर लॉग इन करा. * संकेतस्थळावर आल्यानंतर Know You UAN या पर्यायावर क्लिक करा. * यानंतर स्क्रीनवर तुमचा रजिस्टर्ड 10 अंकी मोबाईल नंबर टाका. बॉक्समध्ये असलेला कॅप्चा कोड भरा. * यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर पडताळणीसाठी एक ओटीपी येईल. * ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोरच्या स्क्रीनमध्ये नाव, जन्मतारीख असा वैयक्तिक तपशील भरण्यासाठी सांगितला जाईल. * त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुमचा आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक विचारला जाईल. * ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Show My UAN असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला UAN क्रमांक मिळेल.

एसएमएसद्वारे UAN अ‌ॅक्टिव्हेट कसा करायचा?

ईपीएफओकडे नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक नोंदणी केलेला असतो. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN हा संदेश पाठवावा लागेल. तुम्ही मेसेज पाठवला की लगेचच तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्याविषयी मेसेज येईल. यामध्ये पीएफ खात्यातील रक्कम,अखेरचे पैसे जमा केलेली तारीख इत्यादी माहिती मिळेल.

ईपीएफओ पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट कसा करायचा?

जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तिथे तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या सॅलरील स्लीपवर देखील युएएन क्रमाक लिहिलेला असतो. ईपीएफओ पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट करण्यासाठी खालील स्टेप वापरा.

स्टेप 1: सर्व प्रथम EPFO च्या वेबसाईटवर Services मेनूमध्ये For Employee या ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 2: यानंतर Services पेज वर दिसणाऱ्या Member UAN/Online Service ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 3: यानंतर नवीन पेज खुलं होईल, तिथे दिसणाऱ्या अ‌ॅक्टिवेट यूनिवर्सल अकाउँट नंबर (UAN) या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 4: इथं तुम्हाला UAN नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टेक्स्ट भरा, यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा

स्टेप 5: यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक OTP येईल. यानंतर डिटेल्स वेरीफाई करा. यानंतर I Agree वर क्लिक करा. यानंतर UAN अ‌ॅक्टिव्हेट करा.

स्टेप 6:UAN नंबर अ‌ॅक्टिव्हेट होण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो. यांनतर तुम्ही PF अकाऊंटशी काम करु शकतो.

संबंधित बातम्या:

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

एजंटची गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधित 4 महत्त्वाची कामं

नोकरी बदलल्यानंतर PF चे पैसे ट्रान्सफर करण्याचं टेन्शन विसरा, पैसे नव्या खात्यात पाठवण्यासाठी वाचा सोप्या टिप्स

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.