Gold Price Rates Today : सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वधारला, जाणून घ्या सोन्याचे दर
सलग दोन दिवस चांदी आणि सोन्याच्या दरांमध्ये बदल होतोय. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव वधारलाय. जाणून घ्या सोनं आणि चांदीचे दर....
नवी दिल्ली : सोने (Gold Price) आणि चांदीच्या (Rates) दरात आज बदल झालाय. तुम्ही सोनं खरेदीस करणार असला तरी खरेदीपूर्वी सोनं चांदीचे दर जाणून घ्यायला हवेत. मराठी नववर्षाला सुरुवात झाली की आपल्या घरात वर्षभरातील ताळेबंद बांधायला सुरुवात करतात. ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांचा अंदाज बांधू लागतात, त्यासाठी वेगळे पैसे बाजूला ठेवतात. विशेष म्हणजे महिला दरवर्षी यंदा कोणता नवीन अलंकार करायचा यासाठी आग्रही असतात. त्यासाठी सोनं-चांदीच्या किंमतीवर देखील त्या लक्ष ठेवतात. सोनं आणि चांदीच्या दरांची माहिती असली की अंदाज बांधता येतो, आपल्याकडे खरेदीसाठी असलेल्या पैशांचा अवाकाही येतो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर सांगणार आहोत. तसेच सोप्या भाषेत सोनं-चांदीच्या दरांतील (Rates) चढ-उतार देखील अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून घेता येईल. हे जाणून घेतल्यास तुम्हाला सोनं-चांदीची खरेदी सहज करता येईल.सोने दरात आज मंगळवारी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोनं 48 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीसह आज सोन्याचा दर 51485 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीच्या किमती वाढल्या आहेत. चांदीच्या दरात किरकोळ 5 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव 66 हजार 300 रुपयांवर आहे.
कुठे किती दर
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 189 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार 570 रुपये आहे. त्याशिवाय 20 कॅरेट सोन्याची किंमत 43 हजार 808 रुपये आहे. सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा भाव 67 हजार 980 रुपयांवर ट्रेड करत आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दर 50 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 51 हजार 483 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा काल सोमवारी भाव 187 रुपयांनी वाढला होता. या वाढीसह चांदीचा भाव 66 हजार 827 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.
सोने दरावर कसाचा परिणा होतो?
सोन्याच्या दरात अमेरिकेतील व्याज दर देखील महत्वपूर्ण आहे. जर अमेरिकेची फेडरल रिझर्व बॅक व्याज दर वाढवायला सुरुवात करते. त्यावेळेस सोन्यातील पैसा अमेरिका बाँडमध्ये जायला लागतो. यामुळे सोन्याचा दर कमी होऊ शकतो. असं असलं तरी सध्या अमेरिकेत असं वाातवरण नाही. मात्र, महागाईची मोठी चिंता आहे. महागाईच्या आकड्यांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.
सोन्याच्या दरातील पडझड
आंतराराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे सोनं-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्चपर्यंत सोन्याचे भाव काहीसे वाढले होते. 55,155 रुपये प्रति तोळा असे 24 कॅरेट सोन्याचे दर त्यावेळी होते. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत गेली. 22 ते 28 मार्च पर्यंत पुन्हा दरात वाढ झाली आणि 29 मार्चला सोन्याने 52,215 रुपये प्रति तोळा एवढी निचांकी पातळी गाठली होती.
इतर बातम्या
NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल
सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट
Elon Musk चा स्वॅगच भारी, आधी ट्विटरचे शेअर खरेदी, आता म्हणतो एडिट बटण पाहिजे