Gold Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा भाव
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर गुरुवारी सोन्याच्या दरात 55 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 47,554 रुपये इतका झाला. चांदीचा भाव 137 रुपयांनी वाढून 65,744 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
मुंबई: सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुरुवारी सोन्याचे भाव वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर गुरुवारी डिसेंबर वायदा सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर डिसेंबर वायदामध्ये चांदीच्या दरात 137 रुपयांची वाढ झाली. जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. डॉलरच्या नरमाईमुळे तिसऱ्या सत्रात सोने वाढले आहे. स्पॉट सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1,784.96 डॉलर्स प्रति औंस झाले आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर गुरुवारी सोन्याच्या दरात 55 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 47,554 रुपये इतका झाला. चांदीचा भाव 137 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 65,744 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
Gold ETF गुंतवणुकीत वाढ
सप्टेंबरमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशातील सणांचा हंगाम पाहता जोरदार मागणीमुळे गुंतवणुकीचा हा ओघ आत्तापर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. गोल्ड ईटीएफ श्रेणीमध्ये आतापर्यंत 3,515 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक प्राप्त झाली आहे.
सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार
दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
भारतात गोल्ड एक्सचेंज उभारणार
बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.
इतर बातम्या
Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव
दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव