Gold Silver Price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या आजचा दर

Gold Rates | त्यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोमवारी सोन्याचा दर 152 रुपयांनी वाढून 46,147 रुपये प्रतितोळा झाला. तर चांदीच्या दरात 628 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो दर 60,583 रुपये इतका झाला आहे.

Gold Silver Price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या आजचा दर
सोन्याचे दर 48 हजारांच्या खाली
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 11:42 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे सोमवारी भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात वाढ होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.33 टक्क्यांनी वाढला. तर डिसेंबर वायद्याच्या चांदीच्या किंमतीमध्ये 1 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. चीनची एव्हरग्रांड ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर असल्यान सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोमवारी सोन्याचा दर 152 रुपयांनी वाढून 46,147 रुपये प्रतितोळा झाला. तर चांदीच्या दरात 628 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो दर 60,583 रुपये इतका झाला आहे.

सोने सप्टेंबर महिन्यातील निचांकी पातळीवर

रविवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याचा भाव सप्टेंबर महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचला होता. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

लसीकरणाचा वाढलेला आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे भारतात सोन्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय, अमेरिकन फेडरल बँकेकडून देण्यात आलेल्या व्याज दरवाढीच्या संकेतांमुळेही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 46 हजारांच्या खाली आले आहे. आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला होता. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली होती.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.